'धार्मिक राजकारण करून, घरं पेटविण्याचं काम करतेय भाजपा'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 03:48 PM2018-10-21T15:48:42+5:302018-10-21T15:50:18+5:30
राज्यातील शेतकऱ्यांना एक छदामही मिळाला नाही. त्यामुळे भाजपने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये मोठा घोटाळा केल्याचा घणाघात सेनाप्रमुख उध्दव ठाकरेंनी केला.
अहमदनगर - तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही आमची भूमिका आहे. मात्र, धार्मिक राजकारण करून घरे पेटवण्याचे काम भाजपा करत आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. तसेच आम्ही सरकारचा विरोध करीत नसून फक्त जनतेची बाजू मांडत आहोत. राम मंदिरासाठी सगळे शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहेत. रामाची शपथ घेऊन राममंदिर उभारू असे, म्हणत उद्धव ठाकरेंनीभाजपावर घणाघाती टीका केली.
राज्यातील शेतकऱ्यांना एक छदामही मिळाला नाही. त्यामुळे भाजपने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये मोठा घोटाळा केल्याचा घणाघात सेनाप्रमुख उध्दव ठाकरेंनी केला. अहमदनगर येथील रेसिडेन्सिअल हायस्कूलच्या प्रांगणातील जाहीर सभेत ते बोलत होते.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, मंदिर वही बनायेंगे, तारीख नही बतायेंगे, असे खोटे आश्वासन सरकार देत आहे. आताचे सरकार मजबूत आहे. शिवसेना सरकारमधून बाहेर पडून काहीही होणार नाही. मोहन भागवत यांचेही मी आभार मानतो. जी मागणी आम्ही केली ती भागवतांनी केली. राममंदिरासाठी सगळे शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहेत, असेही ठाकरे म्हणाले. रामाची शपथ घेऊन राममंदिर उभारू असे, ठाकरे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली. दरम्यान, याप्रसंगी अहमदनगर येतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका कलावती शेळके व काँग्रेसचे नगरसेवक संजय लोंढेंनी शिवसेनेत प्रवेश केला.