वीजबील माफीसाठी भाजपचे आंदोलन, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 02:33 PM2021-02-05T14:33:49+5:302021-02-05T14:34:34+5:30

१०० युनीटपर्यंत वीजेचा वापर असलेल्या घरगुती ग्राहकांचे वीजबिल माफ करावे, यासह अनेक मागण्या भारतीय जनता पक्षाच्यावतीने करत शुक्रवारी (दि. ५) नवीन नगर रसत्यावरील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

BJP's agitation for electricity bill waiver, loud sloganeering against the government | वीजबील माफीसाठी भाजपचे आंदोलन, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

वीजबील माफीसाठी भाजपचे आंदोलन, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

संगमनेर : थकित विजबिलांमुळे ग्राहकांची वीज जोडणी खंडीत करू नये. वीज जोडणी खंडीत करण्याची सुरू असलेली मोहिम त्वरित थांबवाबी. १०० युनीटपर्यंत वीजेचा वापर असलेल्या घरगुती ग्राहकांचे वीजबिल माफ करावे, यासह अनेक मागण्या भारतीय जनता पक्षाच्यावतीने करत शुक्रवारी (दि. ५) नवीन नगर रसत्यावरील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात संगमनेर तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणफुले, व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक शिरीष मुळे, काशिनाथ पावसे, किशोर गुप्ता, राजाराम लांडगे, अप्पासाहेब आहेर, सोपान हासे, दादासाहेब नेहे, दिपक भगत, सुनील खरे, प्रवीण कर्पे, दिपेश ताटकर, संपत गलांडे, भैया परदेशी, भारत गवळी, संजय नाकील, सिताराम मोहरीकर, मनोज जुंदरे यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मागण्या मान्य न झाल्यास महावितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 

Web Title: BJP's agitation for electricity bill waiver, loud sloganeering against the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.