पिक कर्ज वाटपाच्या मागणीसाठी भाजपाचे काष्टी, लोणीव्यंकनाथ येथे बँकेसमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 03:53 PM2020-06-24T15:53:02+5:302020-06-24T15:53:52+5:30
पावसाळा सुरु झाला तरी अजूनही शेतक-यांना बँकेने कर्ज दिलेले नाही. शेती पिक कर्ज तातडीने वाटप करावे, या मागणीसाठी बुधवारी (२४ जून) आमदार बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली काष्टी येथील युनियन बँक, महाराष्ट्र बँक व लोणीव्यंकनाथ येथील स्टेट बँकेसमोर आंदोलन केले.
श्रीगोंदा : पावसाळा सुरु झाला तरी अजूनही शेतक-यांना बँकेने कर्ज दिलेले नाही. शेती पिक कर्ज तातडीने वाटप करावे, या मागणीसाठी बुधवारी (२४ जून) आमदार बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली काष्टी येथील युनियन बँक, महाराष्ट्र बँक व लोणीव्यंकनाथ येथील स्टेट बँकेसमोर आंदोलन केले.
कोरोना संकटाच्या काळात देश थांबला. हरभरा खराब झाला. तूर अजून विकली जात नाही. शेतक-यांना नवीन बियाणे, खते खरेदीसाठी पैसे नाहीत. पैसे नसल्याने त्यांनी कर्जासाठी बँकांकडे अर्ज केले आहेत. मात्र अजूनही बँकांनी शेतकºयांना कर्ज दिलेले नाही. बँकांनी तत्काळ कर्ज मंजूर करून कर्जाचे पैसे शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करावेत. दखल न घेतल्यास पुन्हा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आमदार पाचपुते यांनी दिला.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते, भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, विक्रमसिंह पाचपुते, गणपतराव काकडे, अनुजा गायकवाड, भास्कर जगताप, दीपक शिंदे, राजेंद्र उकांडे, शिवाजीराव जाधव, गोरख ओहळ, दीपक हिरनावळे, उमेश बोरुडे, सुहास काकडे, महेश क्षीरसागर व पदाधिकारी उपस्थित होते.