भाजपचे घंटानाद आंदोलन : साईनगरीत पाच आंदोलकांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 17:34 IST2020-08-29T17:32:08+5:302020-08-29T17:34:14+5:30
साईमंदिरासह राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी शनिवारी (२९ आॅगस्ट) टाळ, मृदुंगाच्या गजरात साईदरबारी घंटानाद करण्यात आला. याप्रकरणी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भाजपचे घंटानाद आंदोलन : साईनगरीत पाच आंदोलकांवर गुन्हा दाखल
शिर्डी : साईमंदिरासह राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी शनिवारी (२९ आॅगस्ट) टाळ, मृदुंगाच्या गजरात साईदरबारी घंटानाद करण्यात आला. याप्रकरणी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हे दाखल केलेल्यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे, बाळासाहेब माणिकराव वाघ, नगरसेवक सुजीत गोंदकर व रविंद्र गोंदकर यांचा समावेश असल्याचे पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले.
कोरोनाकाळात जिल्हाधिका-यांनी जमावबंदीचा आदेश काढला आहे. या आदेशाचे उल्लघन केल्याप्रकरणी आंदोलनाच्या आयोजकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.