श्रीगोंद्यात भाजपचे हल्ल्लाबोल आंदोलन, सक्तीची वसुली थांबवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 02:56 PM2021-02-05T14:56:20+5:302021-02-05T14:57:16+5:30
राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली करण्याऐवजी वीज मंडळाला १ हजार कोटीची तरतूद करावी व शेतकरी वाचवावा, असे प्रतिपादन आमदार बबनराव पाचपुते यांनी वीज वितरणच्या विरोधातील आंदोलनावेळी केले.
श्रीगोंदा : राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली करण्याऐवजी वीज मंडळाला १ हजार कोटीची तरतूद करावी व शेतकरी वाचवावा, असे प्रतिपादन आमदार बबनराव पाचपुते यांनी वीज वितरणच्या विरोधातील आंदोलनावेळी केले. आमदार पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी श्रीगोंदा येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन केले.
पाचपुते पुढे म्हणाले, तालुक्यात घोड विसापूर व कुकडीचे आवर्तन चालू आहे. अशा वेळी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. हा सावळा गोंधळ असताना ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महावितरणच्या बोगस कारभारावर हल्ला चढविला.
यावेळी वीज वितरणचे अधिकारी चौगुले यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.