दूध दरवाढीसाठी कोपरगावात भाजपचे महाएल्गार आंदोलन; झोपी गेलेल्या जागे करा; स्रेहलता कोल्हे यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 01:05 PM2020-08-01T13:05:55+5:302020-08-01T13:06:43+5:30
राज्यातील पशुपालक व शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यासाठी झोपी गेलेल्या सरकारला आता जाग आणण्याची गरज आहे. जोपर्यंत दूध उत्पादकांच्या दुधाला रास्त भाव मिळत नाही. तोपर्यंत शेतकºयांच्या प्रश्नासाठी लढा चालूच राहील, असा इशारा भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिला.
चांदेकसारे : राज्यातील पशुपालक व शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यासाठी झोपी गेलेल्या सरकारला आता जाग आणण्याची गरज आहे. जोपर्यंत दूध उत्पादकांच्या दुधाला रास्त भाव मिळत नाही. तोपर्यंत शेतकºयांच्या प्रश्नासाठी लढा चालूच राहील, असा इशारा भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिला.
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे झगडेफाटा चौफुलीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने दृध दरवाढीसाठी शनिवारी (१ आॅगस्ट) महाएल्गार आंदोलन केले. दरम्यान तालुक्यातील ७८ दूध केंद्रावर आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी स्रेहलता कोल्हे बोलत होत्या. या आंदोलनात रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम, रासप, रिपाइं महायुतीच्या कार्यकर्ते सहभागी झाले होते. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त यावेळी अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम, माजी सरपंच केशवराव होन, संचालक संजय होन, केशवराव भवर, दिपक गायकवाड, नितीन कापसे, हरिभाऊ गिरमे, कैलास खैरे, चंद्रकांत औताडे , आप्पासाहेब औताडे, अॅड. ज्ञानेश्वर होन, धनंजय माळी, गणेश राऊत, रमेश औताडे, योगिता होन, सरपंच पूनम खरात, उपसरपंच विजय होन आदी उपस्थित होते.