भाजपच्या महापौर-उपमहापौरांनाच माहिती नाही आत्मनिर्भर योजना, महापालिकेतील ‘या’ योजनेकडे सत्ताधारी भाजपचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 12:22 PM2020-06-20T12:22:14+5:302020-06-20T12:22:24+5:30
अहमदनगर : भाजपकडून केंद्राच्या योजनांचा प्रचार व प्रसार केला जात असला तरी महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला मात्र केंद्राच्याच योजनांचा विसर पडला आहे़ फेरीवाल्यांसाठी केंद्राने सुरू केलेल्या पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजनेचे पत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे़ मात्र सत्ताधाºयांच्या दुर्लक्षामुळे योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडल्याचे चित्र आहे़

लॉकडाऊनच्या काळात फेरीवाल्यांचे व्यवसाय बंद पडले़ त्यांना पुन्हा आपले व्यवसाय सुरू करता यावेत, यासाठी केंद्र सरकारने पथविके्रते पंतप्रधान आत्मनिर्भर योजना सुरू केली आहे़ तसा आदेश महापालिकेला प्राप्त झाला आहे़ मात्र त्यावर महापालिकेकडून अद्याप कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही़ भाजपाचे बाबासाहेब वाकळे हे महापौर आहेत़ उपमहापौर पदही भाजपकडेच आहे़ भाजपचीच सत्ता असलेल्या महापालिकेतच केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे यावरून स्पष्ट होते़
भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र घरोघरी पोहोचविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे़ शहरातील ३० हजार घरांपर्यंत भाजपने हे पत्र पोहोचविल्याचा दावा केला आहे़ परंतु, केंद्राच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न होत नाहीत़ नगर शहरातील फेरीवाल्यांची संख्या तीन हजारांहून अधिक आहे़ सरकारने त्यांचेसाठी दहा हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला़ पण, नगर शहरात या योजनेची अंमलबजावणी होत नसल्याने अद्याप एकाही फेरीवाल्याला दहा हजार रुपयांचे कर्ज मिळू शकलेले नाही़
---
शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजना
फेरीवाल्यांना १० हजारांपर्यंतचे कर्ज
नियमित कर्जफेड करणाºयांना प्रोत्साहन देणे
डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देणे
बंद पडलेले व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज योजना