भाजपची श्रीरामपूर तालुका जम्बो कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:19 AM2021-03-22T04:19:01+5:302021-03-22T04:19:01+5:30
श्रीरामपूर : भारतीय जनता पक्षाची तालुका जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यात जुन्या, नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घातल्याची माहिती ...
श्रीरामपूर : भारतीय जनता पक्षाची तालुका जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यात जुन्या, नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घातल्याची माहिती तालुकाध्यक्ष बबनराव मुठे यांनी दिली.
कार्यकारिणीत १३ उपाध्यक्ष, २ सरचिटणीस, १० चिटणीस, एक कोषाध्यक्ष, एक कार्यालयीन चिटणीस, ४५ कार्यकारिणी सदस्य, १४ इतर आघाड्यांसह चार कायम निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. एकूण १०४ जणांचा समावेश असल्याचे मुठे यांनी सांगितले.
तालुका उपाध्यक्ष- पुरुषोत्तम भराटे, शंकर मुठे, ज्ञानेश्वर वेताळ, अप्पासाहेब वाणी, अरुण काळे, अरुण शिंदे, माधुरी ढवळे, बापूसाहेब वडीतके, शैलेश खाटेकर, रवींद्र उंडे, संजय भिंगारे, संदीप चितळकर, दीपक मिसाळ. सरचिटणीस-प्रफुल्ल डावरे, संतोष हारगुडे. चिटणीस-आकाश वाणी, बाबासाहेब पटारे, राहुल राऊत, पाराजी गायके, सारिका खरात, दादासाहेब अनुशे, अमोल जानराव, प्रताप मगर, निलेश राऊत, बक्शन शेख, यांचा समावेश करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नेते हेरंब आवटी, सुनील मुथा, संभाजी कवडे, सुधाकर लिप्टे हे कायम निमंत्रित सदस्य आहेत. महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष डॉ. अश्विनी लिप्टे यांची नियुक्ती करण्यात आली.
दत्तात्रेय जाधव (युवा मोर्चा), बापूसाहेब वमने (किसान मोर्चा), सिद्धार्थ कदम (अनुसूचित जाती अध्यक्ष), नवनाथ लांडे (भटके विमुक्त), गणी सय्यद (अल्पसंख्याक आघाडी), साईनाथ गायकवाड (अनु. जमाती), शरद बेहळे (ओबीसी मोर्चा, संदीप आसने (प्रसिद्धिप्रमुख), संदीप महाराज (आध्यात्मिक आघाडी), अशोक राशीनकर (सहकार आघाडी), डॉ. अनिल भगत (वैद्यकीय आघाडी, नवनाथ कर्डिले (सांस्कृतिक आघाडी) यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले.