भाजपवाल्यांना साईबाबांचा प्रसादही कमी पडला : हर्षवर्धन पाटील यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 01:59 PM2018-10-19T13:59:09+5:302018-10-19T13:59:21+5:30

श्रीगोंदा : शिर्डीच्या साईबाबांचे भक्त एक एक रुपया दानपेटी भरतात. त्यातुन सुविधा व अन्नछात्र चालावे. आरोग्य सुविधा निर्माण व्हाव्यात. ...

The BJPwalias had a lack of respect for Saibaba: Harshvardhan Patil's question was asked | भाजपवाल्यांना साईबाबांचा प्रसादही कमी पडला : हर्षवर्धन पाटील यांचा सवाल

भाजपवाल्यांना साईबाबांचा प्रसादही कमी पडला : हर्षवर्धन पाटील यांचा सवाल

श्रीगोंदा : शिर्डीच्या साईबाबांचे भक्त एक एक रुपया दानपेटी भरतात. त्यातुन सुविधा व अन्नछात्र चालावे. आरोग्य सुविधा निर्माण व्हाव्यात. अशी अपेक्षा त्यामागे आहे. पण राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौ-यासाठी शिर्डी संस्थानकडून तीन कोटी रुपये घेतले. भाजपवाल्यांना साईबाबांचा प्रसाही कमी पडला आहे. त्यामुळे जनतेला काय देणार? असा जाहीर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्रीगोंदा फॅक्टरी येथे बोलताना केले.
शिवाजीराव नागवडे साखर कारखान्याचे ४५ व्या गाळप हंगाम शुभारंभ हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीला आले त्यांचे स्वागत आहे. त्यांच्या दौ-याचा खर्च केंद्र व राज्य सरकारने आवश्यक होते. पण त्यांनी साईबाबांच्या झोळीत हात घाऊन तीन कोटी काढले. स्वत:चा मोठेपणा केला. या भाजपाच्या नितीला रोखावे लागेल. महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या किमती सर्वात जादा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी दौ-यावर येण्यापूर्वी डिझेल - पेट्रोल किमतीवर विचार करणे गरजेचे होते. सेनेच्या सभा मोठ्या होतात पण सेना भाजपाची संगत सोडत नाही. दुखणं तिथेच आहे. आता दोन्ही कॉँॅग्रेसची आघाडी होणार आहे. भाजप सेनेचे फाटले तर काँग्रेसचे राजकिय गणित जुळणार आहे, असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला

Web Title: The BJPwalias had a lack of respect for Saibaba: Harshvardhan Patil's question was asked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.