काळ्या गुढ्या उभारून पुणतांब्यात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 07:28 PM2019-02-06T19:28:32+5:302019-02-06T19:28:37+5:30

किसान क्रांती समन्वय समितीच्या ‘देता की जाता’ आंदोलनास पाठिंबा देत पुणतांबा येथील कृषिकन्यांनी अन्नत्याग केल्याने त्यांचे वजन घटले आहे.

 Black muffins are sticking to the pulp | काळ्या गुढ्या उभारून पुणतांब्यात कडकडीत बंद

काळ्या गुढ्या उभारून पुणतांब्यात कडकडीत बंद

शिर्डी : किसान क्रांती समन्वय समितीच्या ‘देता की जाता’ आंदोलनास पाठिंबा देत पुणतांबा येथील कृषिकन्यांनी अन्नत्याग केल्याने त्यांचे वजन घटले आहे. बुधवारी तिसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी घरांवर काळ्या गुढ्या उभारून कडकडीत बंद पाळला. गावातून शालेय विद्यार्थिनींनी मोर्चा काढत सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली.
शेतीमालावा योग्य भाव मिळावा, संपूर्ण कर्जमाफी करावी यासह शेतकºयांच्या विविध प्रश्नावर तीन दिवसांपासून पुणतांबा येथे शेतकºयांच्या मुलींनी आंदोलन सुरू आहे. आंदोलनाची दखल न घेतल्यास सरकारविरूध्द संघर्ष करण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. मंगळवारी रात्री ग्रामस्थांनी गावातून ‘कॅण्डल मार्च’ करून सरकारचा निषेध नोंदविला. आंदोलनाच्या तिसºया दिवशी (बुधवारी) दिवसभर सर्व व्यापाºयांनी दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला. शालेय विद्यार्थिनी व ग्रामस्थांनी काळ्या फिती लावून गावातून निषेध मोर्चा काढला. दरम्यान डॉक्टरांच्या पथकाने आंदोलनकर्त्यांची आरोग्य तपासणी केली असता त्यांचे वजन घटल्याचे लक्षात आले. राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेण्याची मागणी समिती सदस्य सुहास वहाडणे, चंद्रकांत वाटेकर, सर्जेराव जाधव, दत्ता सुरळकर, संभाजी गमे, सुधाकर जाधव, गणेश बनकर, महेश कुलकर्णी, भाऊसाहेब केरे यांनी केली.
 

Web Title:  Black muffins are sticking to the pulp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.