व्यवस्थेला दोष देणे हेच मानवाधिकाराचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:34 AM2020-12-14T04:34:29+5:302020-12-14T04:34:29+5:30
अहमदनगर : समाज बिघडला, तर व्यवस्था बिघडते. व्यवस्थेला दोष देण्याची प्रवृत्ती म्हणजेच मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. मनुष्य हा सुरक्षित राहण्यासाठी ...
अहमदनगर : समाज बिघडला, तर व्यवस्था बिघडते. व्यवस्थेला दोष देण्याची प्रवृत्ती म्हणजेच मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. मनुष्य हा सुरक्षित राहण्यासाठी प्राण्यांच्या कळपातून बाहेर पडला व मानवीहक्काचे संरक्षण करू लागला. मानवीहक्काचे उल्लंघन होत असताना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींसह महापुरुष व संतांनी पुढाकार घेऊन समाज घडविण्याचे कार्य केले, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्ताने कोरोना काळात मानवाधिकार संरक्षणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मानवाधिकार अभियानामार्फत पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे. पुरस्काराचा वितरण समारंभ सी.एस.आर.डी. समाजकार्य महाविद्यालयात झाले. हजारो स्थलांतरित मजुरांसाठी देवदूत ठरलेल्या सी.एस.आर.डी.चे संचालक डॉ. सुरेश पठारे, भिंगार भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी ठरलेले भिंगार छावणी परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, रस्त्यावर उतरून लोकांना शिस्त लावल्यासोबतच अनेकांच्या गरजा भागवणारे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, अहमदनगर महानगरपालिकेमार्फत कम्युनिटी किचन सुरू करून मोफत भोजनव्यवस्था करणारे अहमदनगर महानगरपालिकाचे पाणीपुरवठा अधिकारी परिमल निकम, ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी योगदान देणारे खातगाव टाकळीचे उपसरपंच ज्ञानेश्वर पठारे, आरोग्य क्षेत्रातील अतुलनीय योगदनाबद्दल बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांना विशेष पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी मानवाधिकार अभियानचे प्रदेशाध्यक्ष अॅड. संतोष गायकवाड, संध्या मेढे, सॅम्युअल वाघमारे, अनिल गंगावणे, योगेश तुपविहिरे, विठ्ठल कोतकर, जालिंदर बोरुडे, गणेश ननावरे, संजय कांबळे, दीपक पुरी, प्रकाश पाचारणे, राजेंद्र सातपुते आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संध्या मेढे यांनी संविधान वाचन केले. मानवाधिकार अभियानाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. संतोष गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्याक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागूल यांनी केले. जिल्हाध्यक्ष गंगावणे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
---
फोटो- १३सीएसआरडी
कोरोना काळात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा मानवाधिकार अभियानामार्फत पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समवेत डॉ. सुरेश पठारे, विद्याधर पवार, संदीप मिटके, परिमल निकम यांच्यासह पुरस्कारार्थी दिसत आहेत.