काळवीट मृत्यूप्रकरणी वनाधिकारी, संरक्षकावर ठपका

By Admin | Published: April 9, 2017 05:08 PM2017-04-09T17:08:17+5:302017-04-09T17:08:17+5:30

जखमी मादी काळविटाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा ठपका उपवनसंरक्षक समितीने पारनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत कोकाटे व गार्ड यांच्यावर ठेवला आहे.

Blasphemy case on black flare | काळवीट मृत्यूप्रकरणी वनाधिकारी, संरक्षकावर ठपका

काळवीट मृत्यूप्रकरणी वनाधिकारी, संरक्षकावर ठपका

आॅनलाईन लोकमत
पारनेर (अहमदनगर), दि़ ९- जखमी मादी काळविटाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा ठपका उपवनसंरक्षक समितीने पारनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत कोकाटे व गार्ड यांच्यावर ठेवला आहे. यामुळे जिल्ह्यातील वन विभाग वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पारनेर तालुक्यातील पारनेर-राळेगणसिद्धी मार्गावर राळेगणसिद्धीनजीक दोन्ही पायांला जखम झाल्याने दोन एप्रिल रोजी काळविटाची मादी रस्त्यावरच पडली होती़ त्याच्यावर वन विभागात उपचार सुरू होते़ पशुवैद्यकीय अधिकारी गुंड यांनी त्याच्यावर उपचारही सुरू केले होते़वन विभागाने उपचार करताना काळविटाला बाथरूममध्ये कोंडले होते. बाथरूममध्ये कोंडल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे़
दरम्यान, मृत्यू होऊनही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काळविटाकडे दुर्लक्ष केल्याने मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास परिसरात दुर्गंधी पसरल्याने वन विभागाच्या मागील बाजूस राहणाऱ्या रहिवाशांनी याबाबत काही ग्रामस्थांना माहिती दिली़ ग्रामस्थांनी फिरून पाहिल्यावर वन विभागाच्या ज्या खोलीत काळवीट होते; तेथूनच दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले. काही युवक तेथे गेल्यावर वन विभागाच्या त्या कोंडवाड्याच्या खोलीत काळविटाची मादी मरण पावल्याचे दिसून आले. बाथरूममध्येच डांबल्याने काळविटाचा मृत्यू झाला होता़ त्यामुळे मोठी दुर्गंधी सुटली होती. याची माहिती पारनेरमधील युवक व पत्रकारांनी जिल्हा वनसंरक्षक श्री लक्ष्मी यांना दूरध्वनीवर दिल्यानंतर त्यांनी गंभीर दखल घेत तातडीने सहायक वनसंरक्षक संजय कडू यांना पाठवले. कडू यांनीही या प्रकाराची चौकशी करून काळविटाच्या मादीचा मृत्यू व त्यानंतर करण्यात येणाऱ्या कारवाईत हलगर्जीपणा केल्याचा ठपका वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत कोकाटे व रक्षक शिंदे यांच्यावर ठेवला आहे़ त्यांनी दोघांनीही काळविटाची जखमी मादी वन विभागात आणली असून, उपचार चालू असल्याचे वरिष्ठांना सांगणे आवश्यक होते. तसेच मुख्यालयी राहात नसल्याने त्या मादीचा संशयास्पद मृत्यू होऊनही नंतरच्या कारवाईत दिरंगाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे़

Web Title: Blasphemy case on black flare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.