काळवीट मृत्यूप्रकरणी वनाधिकारी, संरक्षकावर ठपका

By Admin | Published: April 10, 2017 03:57 AM2017-04-10T03:57:16+5:302017-04-10T03:57:16+5:30

जखमी मादी काळविटाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याने उपवनसंरक्षक स

Blasphemy case on black flare | काळवीट मृत्यूप्रकरणी वनाधिकारी, संरक्षकावर ठपका

काळवीट मृत्यूप्रकरणी वनाधिकारी, संरक्षकावर ठपका

पारनेर (अहमदनगर) : जखमी मादी काळविटाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याने उपवनसंरक्षक समितीने पारनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत कोकाटे व गार्ड यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवला आहे़
पारनेर तालुक्यातील पारनेर-राळेगणसिद्धी मार्गावर राळेगणसिद्धीनजीक २ एप्रिल रोजी मादी काळवीट जखमी अवस्थेत सापडले होते. दोन पायांना जखम झालेल्या या काळविटावर पशुवैद्यकीय अधिकारी गुंड यांच्या देखरेखीखाली वन विभागात उपचार सुरू होते़ उपचारांदरम्यान काळविटाला न्हाणीघरात कोंडण्यात आले होते. त्यामुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज आहे.
मृत्यूनंतरही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास परिसरात दुर्गंधी पसरल्याने ग्रामस्थांनी तक्रार केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. याची माहिती पारनेरमधील युवक व पत्रकारांनी जिल्हा वनसंरक्षक लक्ष्मी यांना दूरध्वनीवर दिल्यानंतर त्यांनी तातडीने सहायक वनसंरक्षक संजय कडू यांना घटनास्थळी पाठवले. कडू यांनी या प्रकाराची चौकशी करून वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत कोकाटे व रक्षक शिंदे यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवला आहे़ (तालुका प्रतिनिधी)

पारनेर येथील वन विभागाच्या ताब्यात असणाऱ्या काळविटाच्या मादीचा संशयास्पद मृत्यू प्रकरणात व नंतरच्या कार्यवाहीत हलगर्जीपणा झाला असून, त्याचा अहवाल जिल्हा वनसंरक्षक लक्ष्मी यांच्याकडे पाठवला आहे़
- संजय कडू, उपवनसंरक्षक, वन विभाग, नगर

Web Title: Blasphemy case on black flare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.