निघोज-पारनेर रस्त्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:27 AM2021-02-27T04:27:49+5:302021-02-27T04:27:49+5:30
निघोज : शेतीपंपाचा वीजपुरवठा बंद केल्याने शेतकऱ्यांनी निघोज-पारनेर रस्त्यावर निघोज येथे शुक्रवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतकरी-महावितरणच्या ...
निघोज : शेतीपंपाचा वीजपुरवठा बंद केल्याने शेतकऱ्यांनी निघोज-पारनेर रस्त्यावर निघोज येथे शुक्रवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतकरी-महावितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. यावेळी महावितरणचे उपअभियंता एन. एल. शेळके यांना घेराव घालण्यात आला.यावेळी महावितरणचे उपअभियंता एन. एल. शेळके यांना घेराव घालण्यात आला.
निघोज, वडनेर बुद्रुक, शिरापूर, चोंभूत, रेनवडी, देवीभोयरे, जवळे, शिरुले, वडगाव, पठारवाडी, गुणोरे, गाडीलगाव, म्हस्केवाडी परिसरातील शेतीपंपाची वीज बिले थकल्याने वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी महावितरणचे उपअभियंता एन. एल. शेळके यांना घेराव घातला. त्यातूनही तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी निघोज-पारनेर रास्ता रोको सुरू केला. आंदोलन दोन तास सुरू होते. शेळके यांनी वरिष्ठांना परिस्थितीची माहिती दिली. दुपारी एकच्या सुमारास नगर येथील मुख्य कार्यकारी अभियंता कन्हैय्यालाल ठाकूर आंदोलनस्थळी आले. आंदोलकांशी त्यांनी चर्चा केली.
शेतकऱ्यांनी वीजजोडामागे पाच हजार रुपये पाच मार्चपर्यंत भरावेत, अन्यथा वीज पुन्हा बंद केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तोपर्यंत शेतीपंपाचा वीजपुरवठा नियमितपणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे, निघोजचे उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, देवीभोयऱ्याचे सरपंच विठ्ठलराव सरडे, निघोजचे उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, वडनेरचे सरपंच राहुल सुकाळे, पठारवाडीचे भास्कर सुपेकर, बाळासाहेब लामखडे, विश्वनाथ कोरडे, दिलीप ढवण, ग्रामपंचायत सदस्य गणेश कवाद, योगेश वाव्हळ, अस्लम इनामदार, रावसाहेब वराळ, दत्तात्रय घोगरे, अर्जुन लामखडे, गणेश लंके, विकास शेटे, अनिल नऱ्हे, गंगाराम घोगरे, गणेश शेटे, चंद्रकांत लंके, दत्तात्रय गुंड, भरत ढवळे, गणेश शेटे, विशाल जगदाळे, संदीप वराळ, निवृत्ती वरखडे, संकेत लाळगे, राजू ढवळे, राजू शेटे, बाळू पठारे, रमेश ढवळे, चंद्रकांत लंके, गोरख वरखडे, लहू गागरे आदी उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, सहायक फौजदार अशोक निकम यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
-------
महावितरणच्या कृषी योजना २०२० या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. यामध्ये थकीत बिलामध्ये ५० टक्के वीज बिलात सूट आहे. येत्या ५ मार्चपर्यंत विद्युतपंपामागे ५ हजार रुपये भरावेत. अनधिकृत शेतीपंपधारकांनी तातडीने अधिकृत वीजजोडणी घ्यावी.
-एन. एल. शेळके,
सहायक अभियंता, निघोज
---
२६ निघोज आंदोलन
निघोज येथे शेतकऱ्यांनी निघोज-पारनेर रस्त्यावर रास्ता रोको केला.