व्याजाच्या पैशातून तरूणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:09 PM2019-06-21T13:09:15+5:302019-06-21T13:09:58+5:30
व्याजाचे पैसे देत नाही म्हणून तरूणावर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना गुरूवारी रात्री साडेनऊनच्या सुमारास नगर-मनमाड रस्त्यावर पद्मावती पेट्रोलपंपाजवळ घडली.
अहमदनगर : व्याजाचे पैसे देत नाही म्हणून तरूणावर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना गुरूवारी रात्री साडेनऊनच्या सुमारास नगर-मनमाड रस्त्यावर पद्मावती पेट्रोलपंपाजवळ घडली. घटनेनंतर आरोपी स्वत:हून तोफखाना पोलीस ठाण्यात हजर झाला.
योगेश बाबासाहेब इथापे असे मयत तरूणाचे, तर कृष्णा रघुनाथ गायकवाड (रा. तेलकुडगाव, ता. नेवासा, हल्ली रा. अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. मयत योगेशने आरोपी कृष्णाकडून काही रक्कम व्याजाने घेतली होती. वारंवार तगादा लावूनही ती न दिल्याने दोघांत वाद झाले. गुरूवारी आरोपी कृष्णाने योगेशला सावेडीतील पद्मावती पेट्रोलपंपासमोर गाठले व त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्याला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत योगेशचा मृत्यू झाला होता. अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपअधीक्षक संदीप मिटके व तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली.
पद्मावती पेट्रोलपंपासमोर मयत योगेश इथापे याची चहाची टपरी आहे, तर आरोपी कृष्णा गायकवाड याचे तेथेच पंक्चरचे दुकान आहे.