५० दात्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:17 AM2021-01-09T04:17:45+5:302021-01-09T04:17:45+5:30
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे उद्घाटन प्रसंगी डॉ. ...
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे उद्घाटन प्रसंगी डॉ. काळे बोलत होत्या.
जोंधळे ब्लड बँकेचे डॉ. राजाराम जोेंधळे, डॉ. अनुराधा जोंधळे व त्यांच्या पथकाने सहकार्य केले. यावेळी प्रभारी अधिकारी आयुष नोपाणी उपस्थित होते. ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबीराचे वेळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मसुद खान, वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक देशमुख व अन्य, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस कर्मचारी कार्येकर्ते उपस्थित होते.
...................................................................................
दरमहा निवृत्ती वेतन मिळावे
अंगणवाडी सेविकांची मागणी : अन्यथा तीव्र आंदोलन
श्रीरामपूर : सेवासमाप्ती नंतर दरमहा निवृत्ती वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृति समितीच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनचे वतीने श्रीरामपूर पंचायत समिती मधील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रकल्प कार्यालयावर निदशर्ने करून निवेदन देण्यात आले.
युनियनचे सरचिटणीस कॉ. राजेंद्र बावके म्हणाले, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृति समितीतर्फे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवासमाप्ती नंतर दरमहा पेन्शन योजना लागू करावी. शासनाने सकारात्मक आश्वासने देवूनही अद्याप काेणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी राज्यभर तालुका प्रकल्प स्तरावर आंदोलने केली जात आहेत. सरकारने याबाबत निर्णय घेऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा भविष्यात तीव्र स्वरूपाचे आदोलन केले जाईल.
युनियनचे सहचिटणीस कॉ. जीवन सुरुडे, इंद्रायणी दुशिग, रतन गोरे, निर्मला चांदेकर यांची भाषणे झाली. श्रीकृष्ण बडाख, उषा अमोलिक, शांता तागड, शायरा शेख, अनिता परदेशी, पल्लवी फरगडे, प्रमिला सुलाखे, मीना गायके, ज्योती डहाळे, मीरा बोरगे, संगीता विधाटे, अंजली अमोलिक, मीरा भोसले, उषा वाणी, शोभा लोखंडे, कुसुम भापकर, अनिता नवरे, मंगल राऊत, पुष्पा तोरस्कर, मीना गायके, अरुणा डांगे, सविता पडोळे, मीरा भोसले, कमल दौंड यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते.
( ०८ अंगणवाडी कर्मचारी फोटो)