शहीद जवानाच्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान, नेत्रतपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:24 AM2021-08-22T04:24:17+5:302021-08-22T04:24:17+5:30
निंबळक : शहीद जवान संतोष तुकाराम वामन यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शहीद जवान वाचनालय, नवजीवन प्रतिष्ठान समन्वयित डब्ल्यूडीएफ प्रकल्पाअंतर्गत, कमिन्स इंडिया ...
निंबळक : शहीद जवान संतोष तुकाराम वामन यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शहीद जवान वाचनालय, नवजीवन प्रतिष्ठान समन्वयित डब्ल्यूडीएफ प्रकल्पाअंतर्गत, कमिन्स इंडिया फाऊंडेशन, आनंदऋषी नेत्रालयाच्या सहकार्याने देवगाव (ता.नगर) येथे नुकतेच मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पार पडले.
शिबिराचा १२६ रुग्णांनी लाभ घेतला. दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, मेजर विष्णूदास यांचा सेवापूर्ती सोहळा, डॉ. कोठुळे यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मानही करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, गोविंद मोकाटे, संदेश कार्ले, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, उपसरपंच हरिदास खळे, विठ्ठल वामन, माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजी वामन, खाडके गावचे सरपंच पोपट चेमटे, बालेवाडीचे सरपंच हरी पालवे, धनगरवाडीचे सरपंच किशोर सिकारे, युवा नेते दत्त तापकिरे, नवजीवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार, प्रशांत वामन, रावसाहेब वामन, रामदास वामन, रवींद्र शिंदे, बलभीम मेजर, प्रदीप वामन, भाऊसाहेब वामन, माणिक वामन, नाना वामन, महेंद्र वामन, भाऊसाहेब शिंदे, विजू रसाळ, महादेव जरे आदी उपस्थित होते. माजी सरपंच संजय वामन यांनी कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. गरजू रुग्णांना चष्म्याचे वाटप करण्यात आले.