साईसंस्थान रुग्णालयाला रक्ताचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 08:47 PM2020-04-30T20:47:41+5:302020-04-30T20:53:38+5:30

शिडी : लॉकडाऊनच्या काळात साईबाबा संस्थानला आॅनलाईनद्वारे पैशाचे डोनेशन सुरू असले तरी भाविकांकडून होणारे ब्लड डोनेशन बंद झाले आहे़  या पार्श्वभुमीवर साईसंस्थान रूग्णालयाला सध्या रक्ताची वाणवा आहे़

Blood transfusion to Sai Sansthan Hospital | साईसंस्थान रुग्णालयाला रक्ताचा तुटवडा

साईसंस्थान रुग्णालयाला रक्ताचा तुटवडा

लोकमत न्यूज नेटवर्क
शिडी : लॉकडाऊनच्या काळात साईबाबा संस्थानला आॅनलाईनद्वारे पैशाचे डोनेशन सुरू असले तरी भाविकांकडून होणारे ब्लड डोनेशन बंद झाले आहे़  या पार्श्वभुमीवर साईसंस्थान रूग्णालयाला सध्या रक्ताची वाणवा आहे़
साईबाबा मंदीर परिसरात साईबाबा रक्त पेढीसह जवळपास नऊ रक्त पेढ्या रक्त संकलन करत आहेत. गेल्या वर्षभरात तब्बल १७ हजार ९९२ भाविकांनी रक्त दान केले़  याशिवाय संस्थानच्या रक्त पेढीत जावूनही ११ हजार १७२ नागरिकांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले़
साईबाबा संस्थान रक्त पेढीत जवळपास चारशे बाटल्यांचा साठा असतो़  आता हा साठा तीस-चाळीसवर आला आहे़  सध्या लॉकडाऊनमुळे रूग्णालय काही अंशीच सुरू असले तरी डिलेव्हरी, अ‍ॅनिमिया व तातडीच्या शस्त्रक्रियांसाठी रक्तांची आवश्यकता असते़  मंदीर बंद होण्यापूर्वी जमा झालेले रक्त संस्थानची दोन्ही रूग्णालये व बाहेरील काही रूग्णांसाठी खर्ची पडले़  साठवलेल्या रक्ताचे आयुर्मान केवळ पस्तीस दिवसांचे असते़  संस्थान रक्तपेढीत रक्ताचे घटक सुद्धा बनवले जातात़  सध्या मात्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे़  एकाच वेळी रक्तदान शिबीर घेवून जमा झालेले रक्त कितपत वापरले जाईल, याबाबत रक्तपेढीच्या व्यवस्थापनाला शंका आहे़  त्यामुळे लॉकडाऊन संपत नाही, तोपर्यंत आवश्यकतेनुसार रक्त जमा करण्याची त्यांची भुमिका आहे़  यामुळेच संस्थानने इच्छुक रक्तदात्यांना नोंदणी करून ठेवण्यास सांगितले आहे़  तसेच रक्तपेढीकडे सुद्धा काही दात्यांची यादी आहे़  सध्या त्यानुसार या दात्यांशी संपर्क साधला जात आहे़  मात्र लॉकडाऊनमुळे मिळणारा प्रतिसाद अत्यल्प आहे़  यामुळे शिर्डीतील अनेक तरुणांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे़
    
 

Web Title: Blood transfusion to Sai Sansthan Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.