सुरक्षारक्षकांना मंडळाकडून गणवेश वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:27 AM2020-12-30T04:27:03+5:302020-12-30T04:27:03+5:30
अहमदनगर : राज्य शासनाच्या कामगार विभागाकडून जिल्ह्यातील सुरक्षारक्षकांना गणवेश देण्यात आले असून येथील कामगार मंडळाकडून हे गणवेश सुरक्षारक्षकांना वाटप ...
अहमदनगर : राज्य शासनाच्या कामगार विभागाकडून जिल्ह्यातील सुरक्षारक्षकांना गणवेश देण्यात आले असून येथील कामगार मंडळाकडून हे गणवेश सुरक्षारक्षकांना वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष तथा सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत, निरीक्षक देवकर, स्वाभिमानी सुरक्षा रक्षक संघटनेचे अध्यक्ष किशोर मुरकुटे आदी उपस्थित होते. शासनाच्या कामगार विभागांतर्गत जिल्हा सुरक्षा मंडळामार्फत जिल्ह्यातील विविध सरकारी आस्थापनेत सुरक्षारक्षक सुरक्षा पुरविण्याचे काम करतात. जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाच्या वतीने सुरक्षारक्षकांना दोन वर्षांतून एक गणवेश दिला जातो. यामध्ये गणवेश, गणवेशाचे साहित्य, बुट , रेनकोट , स्वेटर आदी वस्तूंचा समावेश आहे. हा गणवेश दर्जेदार मिळावा व साहित्य वाढवून मिळावे, अशी स्वाभिमानी संघटनेची मागणी होती. या मागणीसाठी संघटनेच्या वतीने वेळोवेळी पाठपुरवा केला होता तसेच अधिकाऱ्यांनीही प्रस्ताव पाठविला होता. संघटनेच्या प्रयत्नांना यश आल्याचे मुरकुटे यांनी सांगितले.
...
सूचना फोटो आहे.