कृषी विद्यापीठात पहारे-याचा मृतदेह आढळला; नातेवाईकांनी केली चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 11:29 AM2021-02-03T11:29:05+5:302021-02-03T11:29:45+5:30

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात मंगळवारी पहाटे ड्युटीवर असलेल्या एका पहारेक-याचा मृतदेह आढळून आला आहे. चंद्रकांत देवराम चव्हाण असे या मृत पहारेक-याचे नाव आहे.

The body of a guard was found at the Agricultural University; Relatives demanded an inquiry | कृषी विद्यापीठात पहारे-याचा मृतदेह आढळला; नातेवाईकांनी केली चौकशीची मागणी

कृषी विद्यापीठात पहारे-याचा मृतदेह आढळला; नातेवाईकांनी केली चौकशीची मागणी

राहुरी : येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात मंगळवारी पहाटे ड्युटीवर असलेल्या एका पहारेक-याचा मृतदेह आढळून आला आहे. चंद्रकांत देवराम चव्हाण असे या मृत पहारेक-याचे नाव आहे.

गेल्या दहा वर्षांपासून सतत व एकाच जागेवर रात्रपाळीची ड्युटी लागत असल्याने चंद्रकांत पवार (वय ३८, रा.खडांबे खुर्द, ता. राहुरी) हे तणावात होते. याच दरम्यान सततची रात्रपाळीची ड्युटी लागत असल्याने चंद्रकांत यांची पत्नी घर सोडून निघून गेली होती. त्यामुळे चंद्रकांतचा संसार मोडला होता, अशी माहिती चंद्रकांतच्या नातेवाईकांनी दिली.

१ फेब्रुवारी रोजी चंद्रकांत पवार हा नेहमीप्रमाणे आपल्या ड्युटीवर गेला. बि-बियाणे अंतर्गत ‘ड’ विभाग या ठिकाणी त्याच्याबरोबर रामाजी गेणूभाऊ शिंदे हा तरूण ड्युटीवर होता. दोघे आळीपाळीने जागून पहारा देत होते. २ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या दरम्यान चंद्रकांत पवार हा मृतावस्थेत आढळून आला. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या रामाजी शिंदे याने चंद्रकांत यांच्या घरच्यांना घटनेची माहिती दिली. नातेवाईकांनी चंद्रकांत यांना तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

चंद्रकांत पवार यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला. याचा अहवाल त्याच्या शवविच्छेदनानंतर प्राप्त होईल. मात्र चंद्रकांत यांच्या मृत्यूने खडांबे खुर्द व विद्यापीठ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चंद्रकांत याच्या पश्चात एक मुलगा, आई वडील व भाऊ असा परिवार आहे. या घटनेबाबत राहुरी पोलिसात आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ब-हाटे हे करीत आहेत. चंद्रकांत पवार यांच्या मृत्यूला फक्त विद्यापीठातील अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

Web Title: The body of a guard was found at the Agricultural University; Relatives demanded an inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.