डोणगाव येथे विहीरीत आढळला विद्यार्थीनीचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 03:28 PM2020-06-20T15:28:31+5:302020-06-20T15:33:48+5:30
हळगाव : जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे बारावीच्या विद्यार्थीनीचा मुतदेह एका विहीरीत आढळुन आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.मुक्ता संभाजी वारे असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. सदर घटना ऑनर किलींगचा प्रकार आहे की खुनाचा यादृष्टीने जामखेड पोलिस अधिक वेगाने तपास करत आहेत. या प्रकरणात एका संशयिताला चौकशीसाठी जामखेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील डोणगाव येथील मुक्ता संभाजी वारे ही विद्यार्थीनी गुरूवारी दुपारी बेपत्ता झाली होती. शुक्रवारी ती बेपत्ता असल्याची तक्रार मयत मुलीचे आजोबा शहाजी कोंडिबा यादव यांनी पोलिसात दाखल केली होती. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास बेपत्ता तरूणीचा मृतदेह डोणगाव शिवारातील अशोक यादव या शेतकर्याच्या शेतातील विहीरीत आढळून आला.जामखेड पोलिस स्टेशनला मुलीचे वडील संभाजी वारे यांनी खबर दिली होती.मयत मुक्ता वारे ही विद्यार्थीनी लहाणपणापासुन डोणगाव या आपल्या आजोळी राहण्यास होती. तीने यावर्षी बारावीची परिक्षा दिली होती. तीचे मुळगाव जामखेड तालुक्यातील रत्नापुर आहे.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, हेड काँस्टेबल शिवाजी भोस , काँस्टेबल विष्णू चव्हाण, बाजीराव सानप, अजय साठे, शशिकांत म्हस्के, पोलिस मित्र अमोल यादव, शुभम यादव, पोलिस पाटील बिभीषण यादव यांनी भेट देत विहीरीतून मृत विद्यार्थीनीचा मृतदेह बाजेच्या सहाय्याने बाहेर काढला. मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी जामखेडच्या ग्रामीण आरोग्य रूग्णालयात पाठवण्यात आला आहे.सदर विद्यार्थीनीच्या मृत्यूप्रकरणाचा तपास अधिक वेगाने जामखेड पोलिस करत आहेत.या प्रकरणात डोणगाव - अरणगाव परिसरातून एका संशयित तरूणास पोलिसांनी ताब्यात घेतले असुन त्याच्याकडून कसून चौकशी केली जात आहे.
फोटो - घटनास्थळाची पाहणी करताना पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, व सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण