दूषितपाणी प्रश्नी शेवगाव येथे बोंबाबोंब आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 03:34 PM2018-03-16T15:34:49+5:302018-03-16T15:35:27+5:30

दूषित पाणीप्रश्नी भाकप व रिपाइं (आठवले) गट, शिवसेना, मनसे, काँंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, टायगर फोर्स व विविध संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्यावतीने शुक्रवारी सकाळी शेवगाव नगर परिषद कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

The Bombabomb movement in Shevgaon, a polluted water question | दूषितपाणी प्रश्नी शेवगाव येथे बोंबाबोंब आंदोलन

दूषितपाणी प्रश्नी शेवगाव येथे बोंबाबोंब आंदोलन

शेवगाव : दूषित पाणीप्रश्नी भाकप व रिपाइं (आठवले) गट, शिवसेना, मनसे, काँंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, टायगर फोर्स व विविध संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्यावतीने शुक्रवारी सकाळी शेवगाव नगर परिषद कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे परिसर दणाणून गेला होता.
शेवगाव शहरात काही दिवसांपासून सुरु असलेल्या पिवळसर दूषित पाणी पुरवठ्यामुळे सुमारे ५० हजारांपर्यंत जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित व अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे शहर व परिसरात साथीच्या आजाराचा फैलाव वाढला आहे. नागरिकांना तातडीने शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. नगर परिषदेच्या गलथान कारभाराच्या निषेधार्थ आंदोलकांनी दिलेल्या जोरदार घोषणांमुळे आंदोलनाची तीव्रता अधिक वाढली. शेवगाव, पाथर्डी शहरासह ५४ गावच्या सुमारे दीड लाख जनतेची तहान भागविणाºया प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेतून दूषित पाणी पुरवठा होत आहे. यामुळे साथीच्या आजाराचा फैलाव वाढला आहे.
माजी जि.प. सदस्य पवनकुमार साळवे, भाकपचे प्रदेश सचिव कॉ. अ‍ॅड. सुभाष लांडे, प्रा.किसन चव्हाण, कॉ.संजय नांगरे, माजी सभापती अविनाश मगरे, प्रकाश तुजारे, विजय बोरुडे, दत्तात्रय फुंदे, एकनाथ कुसळकर, सुनील जगताप, शीतल पुरनाळे, हमीद पठाण, गणेश रांधवणे, विजय जोशी, राजू मगर आदींची भाषणे झाली. साळवे यांनी शेवगाव शहरासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याची मागणी केली. नगरपरिषदेच्या वतीने निवेदन स्वीकारून अशुद्ध पाणी पुरवठ्याबाबत सविस्तर खुलासा करण्यासाठी प्रभारी मुख्य कार्यकरी अधिकारी हजर नसल्याने आंदोलकांनी मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या बेजबाबदारपणाबद्दल नाराजी व्यक्त केली. आंदोलनाबाबत निवेदन देऊनही पदाधिकारी व अधिका-यांपैकी कोणीही आंदोलनाची दखल घेतली नाही. नागरिकांना आठवडाभरात स्वच्छ पाण्याचा पुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

Web Title: The Bombabomb movement in Shevgaon, a polluted water question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.