‘खर्डा लढाई’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:22 AM2021-03-27T04:22:25+5:302021-03-27T04:22:25+5:30

खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरातील सीताराम गड येथे ‘खर्डा लढाई’ या पुस्तकाचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते प्रकाशन ...

Book launching ceremony of 'Kharda Ladhai' | ‘खर्डा लढाई’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

‘खर्डा लढाई’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरातील सीताराम गड येथे ‘खर्डा लढाई’ या पुस्तकाचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी सीताराम गडाचे मठाधिपती महालिंग महाराज नगरे होते. तहसीलदार विशाल नाईकवाडे, राष्ट्रवादीचे सूर्यकांत मोरे, लेखक डॉ. प्रा. अशोक बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन सोहळा झाला. पवार म्हणाले, ‘‘डॉ. अशोक बांगर लिखित ‘खर्डा लढाई’ या पुस्तकाचे प्रकाशन सीताराम गडावर होत आहे, ही एक भाग्याची गोष्ट आहे.’’ खर्डा व परिसरातील लढाईचे ऐतिहासिक महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम या माध्यमातून होत आहे. हे पुस्तक भविष्यात युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी विजयसिंह गोलेकर, वैभव जामकावळे, सरपंच आसाराम गोपाळघरे, शिक्षिका उषा थोरात, माजी सरपंच शिवकुमार गुळवे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष वैभव जामकावळे, मिलन कांकरिया, रतिलाल डोके, राहुल लोळगे, सेवा संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत लोखंडे, प्रा. संजय सुरवसे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक संतोष थोरात, सूत्रसंचालन प्रा. कमल गर्जे, प्रा. शिवाजी आगे यांनी केले. तुळशीदास गोपाळघरे यांनी आभार मानले.

---

२६ खर्डा

सीताराम गड येथे ‘खर्डा लढाई’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी आमदार रोहित पवार व इतर.

Web Title: Book launching ceremony of 'Kharda Ladhai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.