पुस्तके सोप्या भाषेत लिहावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:28 AM2021-06-16T04:28:18+5:302021-06-16T04:28:18+5:30

श्रीरामपूर : शक्यतो साहित्यिकांनी पुस्तके ही सोप्या भाषेत लिहिली पाहिजे. त्यामुळे वाचकांना ती वाचण्यास सुलभ होतील, असे नगराध्यक्ष अनुराधा ...

Books should be written in simple language | पुस्तके सोप्या भाषेत लिहावीत

पुस्तके सोप्या भाषेत लिहावीत

श्रीरामपूर : शक्यतो साहित्यिकांनी पुस्तके ही सोप्या भाषेत लिहिली पाहिजे. त्यामुळे वाचकांना ती वाचण्यास सुलभ होतील, असे नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी सांगितले.

येथील श्रीराम बोबडे लिखित 'संघर्ष श्रीरामाचा' या पुस्तकाचे प्रकाशनप्रसंगी नगराध्यक्ष आदिक बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण निकम, पत्रकार प्रकाश कुलथे, स्नेहलता कुलथे, डॉ. शिवाजी काळे, आरोग्य मित्र सुभाष गायकवाड, देविदास चव्हाण, लेविन भोसले, चंद्रकांत धनवटे, भूषण साठे, प्रमोद बोरा, महेश देशपांडे आदी उपस्थित होते.

लेखक बोबडे यांनी हे पुस्तक आई, वडील यांना समर्पित केले. वडील मोजणीदार होते. उपाशीपोटी आम्ही संघर्ष केला. त्यांनी संयम व प्रामाणिकपणा शिकवला, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन उज्ज्वला पोखरकर यांनी केले. आभार सर्वज्ञ बोबडे यांनी मानले.

------------

Web Title: Books should be written in simple language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.