वडाळा शाळेतील मुलींना पुस्तके, वृक्ष वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:20 AM2021-01-25T04:20:52+5:302021-01-25T04:20:52+5:30
नेवासा : तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या अभियानांतर्गत बालिका दिनानिमित्त वृक्षारोपणासह ...
नेवासा : तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या अभियानांतर्गत बालिका दिनानिमित्त वृक्षारोपणासह विविध उपक्रम राबविण्यात आले. मुलींच्या शिक्षणाविषयी घोषवाक्ये स्पर्धा, वक्तृत्व, हस्ताक्षर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदी उपक्रम पार पडले. तिसरीच्या २३ मुलींना कर्तृत्ववान महिलांच्या जीवन चरित्राची ओळख व्हावी यासाठी पुस्तके वाटप केली. झाडेही भेट देण्यात आली. प्रत्येकीने एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन अध्यापिका सुमन तिजोरे यांनी केले. उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे, शिक्षण विस्ताराधिकारी शिवाजी कराड, खरवंडी केंद्राचे विस्ताराधिकारी सुंबे, खरवंडी केंद्राचे केंद्रप्रमुख जाधव, वडाळा बहिरोबा शाळेचे मुख्याध्यापक अशोक गायकवाड, साळुंके, लता गवळी, आदींचे मार्गदर्शन लाभले.