बूट फेक प्रकरण : सेनेच्या ३ तर राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 04:08 PM2019-05-02T16:08:29+5:302019-05-02T16:09:28+5:30

शहर अभियंत्यावर बूट फेक प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक अशोक बडे, कमल सप्रे, रिता भाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नज्जू पैलवान यांना अपात्र ठरविण्यातबाबतचा प्रस्ताव महापालिकाना प्रशासनाने आज नगरविकास खात्याला पाठविला आहे.

Boot Fake Case: 3 Senna 3, NCP's corporators are hanging in disqualification | बूट फेक प्रकरण : सेनेच्या ३ तर राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार

बूट फेक प्रकरण : सेनेच्या ३ तर राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार

अहमदनगर : शहर अभियंत्यावर बूट फेक प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक अशोक बडे, कमल सप्रे, रिता भाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नज्जू पैलवान यांना अपात्र ठरविण्यातबाबतचा प्रस्ताव महापालिकाना प्रशासनाने आज नगरविकास खात्याला पाठविला आहे.
शहर अभियंत्यावर बूट फेक प्रकरणी सेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह तीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यापैकी सेनेचे नगरसेवक अशोक बडे यांच्यासह मदन आढाव तोफखाना पोलिसांनी अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. याप्रकरणी नगरसेवकांना अपात्र ठरविण्याच्या मागणी महापालिका कर्मचारी युनियने तीन दिवसांपासून सुरु केलेले काम बंद आंदोलन आजही सुरु होते. महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग आणि युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांच्यात आज झालेल्या चर्चेदरम्यान प्रस्ताव नगरविकास खात्याला पाठविण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार आयुक्तांनी हा प्रस्ताव तातडीने शासनाला पाठविला आहे. यामुळे युनियनने आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे शुक्रवारपासून महापालिकेचे कामकाज नियमितपणे सुरु होणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.
नगरसेवकांना अपात्र ठरविण्याबाबतच प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला आहे, असे आयुक्त भालसिंग यांनी सांगितले.

Web Title: Boot Fake Case: 3 Senna 3, NCP's corporators are hanging in disqualification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.