अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बोराडे; उपाध्यक्षपदी प्रताप गांगर्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 01:43 PM2019-09-02T13:43:02+5:302019-09-02T13:47:32+5:30
अहमदनगर जिल्हा परिषद सर्व्हन्टस को-आॅप-क्रेडीट सोसायटीच्या अध्यक्षपदी नारायण बोराडे यांची तर उपाध्यक्षपदी प्रताप उर्फ बाळासाहेब गांगर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड पुढील सहा महिन्यांसाठी असणार आहे.
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा परिषद सर्व्हन्टस को-आॅप-क्रेडीट सोसायटीच्या अध्यक्षपदी नारायण बोराडे यांची तर उपाध्यक्षपदी प्रताप उर्फ बाळासाहेब गांगर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड पुढील सहा महिन्यांसाठी असणार आहे.
कर्मचारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सर्वांना संधी मिळावी, म्हणून दर सहा महिन्यांनी नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडला जात आहे. त्यानुसार सोसायटीचे मावळते अध्यक्ष शशिकांत रासकर यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन अध्यक्षांची निवड करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक व्ही. के. मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रिया राबविण्यात आली. त्यांना प्रभारी व्यवस्थापक राजेंद्र पवार व प्रभारी उपव्यवस्थापक प्रशांत लोखंडे यांचे सहकार्य लाभले. अध्यक्षपदासाठी नारायण बोराडे यांच्या नावाची सूचना संचालक शशिकांत रासकर यांनी मांडली. या सुचनेस संचालक राजाबापू पाठक यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी प्रताप गांगर्डे यांच्या नावाची सुचना संचालक विलास वाघ यांनी मांडली व अनुमोदन संचालक हरी शेळके यांनी दिले. यावेळी संस्थेचे संचालक संजय कडुस, सुभाष कराळे, अरुण जोर्वेकर, भरत घुगे, सोपान हरदास, संतोष नलगे, संजु चौधरी, अरुण शिरसाठ, ज्ञानदेव जवणे, मोहन जायभाये, वालचंद ढवळे, इंदु गोडसे, उषा देशमुख, अशोक काळापहाड, स्विकृत संचालक विलास शेळके, कैलास डावरे, सभासद श्रीकांत भगत, धैर्यशंभो सोलाट, बाळू फटांगरे आदी उपस्थित होते.
बोराडे म्हणाले की, संस्थेच्या निवडणूक काळात सभासदांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात संचालक मंडळाला यश आले आहे. येत्या काळात संस्थेचे सर्व व्यवहार ऑनलाईन करण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय सभासदांना कमीत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.