रेल्वे मालधक्का असोसिएशनच्या अध्यक्षपदी बोरावके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:24 AM2021-08-22T04:24:48+5:302021-08-22T04:24:48+5:30
श्रीरामपूरच्या रेल्वे मालधक्क्याचा बाजारपेठेमध्ये लौकिक आहे. बाजारपेठेच्या प्रगतीसाठी मालधक्क्याचे मोठे योगदान आहे. पूर्वी गुळाची बाजारपेठ, साखरेची आवक-जावक करणारी बाजारपेठ ...
श्रीरामपूरच्या रेल्वे मालधक्क्याचा बाजारपेठेमध्ये लौकिक आहे. बाजारपेठेच्या प्रगतीसाठी मालधक्क्याचे मोठे योगदान आहे. पूर्वी गुळाची बाजारपेठ, साखरेची आवक-जावक करणारी बाजारपेठ देशात प्रसिद्ध होती. मोठ्या प्रमाणात गूळ व साखरेची रवानगी येथून होत होती. गुळाचे उत्पादन कमी होऊन साखर कारखानदारी तालुक्यात वाढली. काही साखर कारखान्यांना श्रीरामपूर रेल्वेस्थानक जवळ पडते. त्यामुळे साखरेची रवानगी परराज्यात होते. अन्य मालही परराज्यातून येतो. सिमेंट, खत, अन्नधान्य, साखर, रेशनिंगचे अन्नधान्य आदी मालाची आवक-जावक मालधक्क्यावरून होते. सहा तालुके येथे जोडले गेले आहेत. मालधक्क्यावरील प्रश्न रेल्वे प्रशासनाकडून सोडविण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे नूतन अध्यक्ष किरण बोरावके यांनी सांगितले.
पदाधिकारी निवड बैठकीत हुंडेकरी असोसिएशनचे दत्तात्रय साबळे, विलास बोरावके, संजय विरकर, प्रकाश चित्ते, विलास गिडे, दर्शन चव्हाण उपस्थित होते.
-------------