उधारीचा धंदा? नको रे बाबा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:52 PM2019-04-28T12:52:44+5:302019-04-28T12:53:30+5:30
उन्हाळी कांदा खरेदीसाठी अनेक व्यापारी थेट बांधावर येऊनच कांदा खरेदी करीत आहेत़ मात्र, मागील फसवणुकीचे अनुभव पाहता उधारीवर कांदा देण्यास शेतकरी नकार देत आहेत़
चांदेकसारे : उन्हाळी कांदा खरेदीसाठी अनेक व्यापारी थेट बांधावर येऊनच कांदा खरेदी करीत आहेत़ मात्र, मागील फसवणुकीचे अनुभव पाहता उधारीवर कांदा देण्यास शेतकरी नकार देत आहेत़ दोन पैसे कमी द्या, पण रोख द्या, अशी मागणी शेतकरी व्यापाऱ्यांकडे करीत आहेत़
मागील दोन वर्षात अनेक व्यापाऱ्यांनी चांदेकसारे, सोनेवाडी परिसरात शेतकºयांचा कांदा जादा दर देऊन उधारीच्या बोलीवर खरेदी केला़ मात्र, अनेक शेतकºयांना व्यापाºयांकडून फसवणूक झाल्याचे अनुभव आले़ कोट्यवधींचा गंडा व्यापाºयांनी शेतकºयांना घातला़ त्यामुळे आता शेतकरी व्यापाºयांवर विश्वास ठेवायला तयार नाहीत़ कमी पैसे द्या, पण रोख द्या, असा पावित्रा शेतकरी घेत आहेत़
सध्या सोनेवाडी पोहेगाव परिसरातील शेतकºयांनी आपला उन्हाळी कांदा काढून चाळीत भरण्यास सुरुवात केली आहे. मात्र परिसरातील तसेच परराज्यातील व्यापारी थेट सोनेवाडीत येऊन कांदा विकत घेत आहेत़ त्यासाठी जादा भाव देऊ, असेही सांगितले जात आहे़ काबाडकष्ट करून पिकवलेला कांदा कवडीमोल भावाने शेतकºयांना विकावा लागला़ मात्र गेल्या दोन-तीन वर्षात अनेक व्यापाºयांनी या परिसरातील शेतकºयांना गोड बोलून फसविले आहे. मागील वर्षी एका व्यापाºयाने सोयाबीन, कांदा व डाळिंब उधारीवर खरेदी केला़ नंतर मात्र त्या व्यापाºयाने शेतकºयांना एक रुपयाही दिला नाही़ त्या व्यापाºयाविरोधात कोपरगाव व शिर्डी पोलीस ठाण्यात शेतकºयांनी फिर्याद दाखल केली. मात्र अद्याप त्या व्यापाºयाचा शोध लागला नाही. त्यामुळे आता शेतकरी हुशारीने व्यापाºयांशी व्यवहार करताना दिसत आहेत़ कांदा खरेदी केला की जागेवरच पैसे द्यावे लागतील, अन्यथा तुम्हाला कांदाच काय पण चिंगळीही मिळणार नाही, अशा शब्दात व्यापाºयांना खडे बोल शेतकरी सुनावत आहेत़