वरुरमधील वादप्रकरणी दोघांना अटक

By Admin | Published: October 29, 2016 12:15 AM2016-10-29T00:15:20+5:302016-10-29T00:41:11+5:30

शेवगाव : वरुर येथे २६ आॅक्टोबरला दोन गटात झालेल्या वादप्रकरणी राजू गायकवाड व आसाराम गरुड (दोघे रा. वरुर) यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ३० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Both of them were arrested in Varur | वरुरमधील वादप्रकरणी दोघांना अटक

वरुरमधील वादप्रकरणी दोघांना अटक


शेवगाव : वरुर येथे २६ आॅक्टोबरला दोन गटात झालेल्या वादप्रकरणी राजू गायकवाड व आसाराम गरुड (दोघे रा. वरुर) यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ३० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दिलीप त्रिंबक वावरे व संदीप दिलीप वावरे यांनी बैल मारतो, बाजूला हो, असे म्हटल्याचा राग आल्याने त्यांना गावातील आसाराम बबन गरुड, राजू योसेफ गायकवाड, शरद योसेफ गायकवाड, फावल्या योसेफ गायकवाड, अंबादास बाजीराव राजगुरू व बन्सी गोरडे (सर्व रा. वरुर) यांनी लोखंडी सळया, काठ्या व फायटरने जखमी केले. तसेच गळ्यातील सोनसाखळी, रोख रक्कम असा एकूण ४२ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरुन नेल्याची तक्रार दिलीप वावरे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दिली होती. जखमी दिलीप वावरे यांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. होते. तेथे त्यांनी दिलेल्या जबाबावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील राजू गायकवाड व आसाराम गरुड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
तक्रार देण्यासाठी दिलीप वावरे, बाळू किसन खैरे, विकी बाबासाहेब मोरे हे शेवगाव पोलीस ठाण्यात आले असता तेथे कैलास तिजोरे, कडू मगर व इतर दहा ते पंधरा लोकांनी तुम्ही आमच्या लोकांच्या विरुद्ध तक्रार देता का? असे म्हणून खाली पाडून मारहाण करुन जखमी केल्याच्या तक्रारीवरुन कैलास तिजोरे, कडू मगर व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यावरुन कैलास तिजोरे व कडू मगर यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आली.
वरुर येथे अजूनही तणाव कायम असला तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. तेथे दंगल नियंत्रण पथक तसेच धडक कृती दल तैनात केल्याची माहिती शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत शिवधरे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Both of them were arrested in Varur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.