बोठेच्या बंगल्याची झडती, रिव्हॉल्व्हर केले जप्त
By | Published: December 5, 2020 04:39 AM2020-12-05T04:39:46+5:302020-12-05T04:39:46+5:30
कितीही पळाला तरी पोलीस आवळणार मुसक्या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बोठे याचा पोलिसांकडून चौफेर शोध सुरू आहे. तो कुठे थांबू ...
कितीही पळाला तरी पोलीस आवळणार मुसक्या
हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बोठे याचा पोलिसांकडून चौफेर शोध सुरू आहे. तो कुठे थांबू शकतो याचा अंदाज घेऊन पोलीस शोध घेत आहेत. येणाऱ्या काळात गरजेनुसार त्याचे बँक अकाऊंटही गोठविले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पसार झाल्यानंतर बोठे याला कोण आश्रय देऊ शकते, याचीही माहिती पोलीस घेत आहेत. त्यामुळे कितीही पळाला तरी पोलीस बोठे याच्या मुसक्या आवळणारच हे निश्चित आहे.
बोठेच्या अटकेनंतरच होणार उलगडा
हत्याकांडात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असली तरी सुपारी देऊन ही हत्या का केली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. जरे यांची हत्या का केली ही बाब बोठे यालाच माहीत असल्याचे अटकेत असलेला आरोपी सागर भिंगारदिवे याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे बोठे याला अटक झाल्यानंतरच या हत्याकांडाचा खुलासा होणार आहे.
पोलिसांच्या तपासाचे कौतुक
जरे यांची हत्या झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी या घटनेचा उलगडा करीत मारेकऱ्यांसह इतर आरोपींना अटक केली, तसेच मुख्य सूत्रधाराचेही नाव समोर आणले. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वत: या तपासात लक्ष्य घातले होते. तपासी अधिकारी अजित पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल ककटे यांच्या पथकानेही मोठे परिश्रम घेतले. या गुन्ह्याचा जलदगतीने तपास झाल्याने पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
फोटो ०४ बाळ बोठे
पोलिसांनी शुक्रवारी दुपारी बाळ बोठे याच्या नगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील जिद्ध या बंगल्याची झडती घेतली.