बोठेचा तात्पुरता अटकपूर्व जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:22 AM2021-01-19T04:22:38+5:302021-01-19T04:22:38+5:30
जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बोठे याने ॲड. संतोष जाधवर यांच्या माध्यमातून ३१ डिसेंबर रोजी खंडपीठात अर्ज केला आहे. ...
जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बोठे याने ॲड. संतोष जाधवर यांच्या माध्यमातून ३१ डिसेंबर रोजी खंडपीठात अर्ज केला आहे. या अर्जावर सोमवारी न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्यासमाेर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने बोठे याचा तात्पुरता अटकपूर्व जामीन फेटाळात सरकारी पक्षाचे म्हणने मागितले आहे. जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात हत्या झाली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. जरे यांच्या हत्येची सुपारी देणारा बोठे मात्र गेल्या दीड महिन्यापासून फरार आहे. सर्वत्र शोध घेऊनही तो पोलिसांना सापडेना.
कुख्यात कासार सापडला बोठे कसा सापडेना?
खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेला नगर तालुक्यातील वाळकी येथील कुख्यात गुंड विश्वजित कासार याला व त्याच्या साथीदारांना दोन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. पोलिसांना कासार सापडला मात्र बोठे कसा सापडेना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या दीड महिन्यापासून एलसीबी पथक बोठेचा चाैफेर शोध घेत आहे. तो मात्र पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत आहे.