Breaking News : टेन्शन वाढलं! अहमदनगरमध्ये 'इनफ्यूएंझा'च्या संशयित तरुणाचा मृत्यू 

By सुदाम देशमुख | Published: March 15, 2023 08:55 AM2023-03-15T08:55:48+5:302023-03-15T08:56:30+5:30

इन्फ्लूएंझा या विषाणूचा संशयित रुग्णाचा अहमदनगरमध्ये मृत्यू झाला आहे.

Breaking News Tension increased Youth suspected of influenza dies in Ahmednagar | Breaking News : टेन्शन वाढलं! अहमदनगरमध्ये 'इनफ्यूएंझा'च्या संशयित तरुणाचा मृत्यू 

Breaking News : टेन्शन वाढलं! अहमदनगरमध्ये 'इनफ्यूएंझा'च्या संशयित तरुणाचा मृत्यू 

अहमदनगर:  इन्फ्लूएंझा या विषाणूचा संशयित रुग्णाचा अहमदनगरमध्ये मृत्यू झाला आहे. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह होती. मात्र त्याला H3N2 ची लक्षणे दिसत होती, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

नगरजवळील एका खासगी वैदयकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या २३ वर्षीय तरुणावर नगर शहरातील एका मोठया रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सोमवारी रात्री १०.३० वाजता त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मंगळवारी दुपारी मृत्यू झालेल्या युवकाच्या रक्ताचे नमुने इन्फ्लूएंझा बाधित आले असल्याचा खासगी प्रयोग शाळेचा अहवाल आल्याबाबत अद्याप यंत्रणेने दुजोरा दिला नाही. 

दुसरीकडे मयत तरुणाचा कोविडचा अहवाल पॉझिटीव्ह होता. मयत तरूण मागील आठवड्यात अलिबागला पर्यटनासाठी गेला होता. तेथून नगरला आल्यावर तो आजारी पडला होता.

नगरमधील मोठ् रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी त्याची प्रकृती गंभीर होती. मयत तरुण मूळचा औरंगाबादचा आहे. दरम्यान, मयत तरूणासोबत आणि संपर्कात आलेल्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title: Breaking News Tension increased Youth suspected of influenza dies in Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.