लाचखोरीत नगर अव्वल
By Admin | Published: May 19, 2014 11:26 PM2014-05-19T23:26:31+5:302024-05-01T11:57:06+5:30
अहमदनगर: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक विभागाने १ जानेवारी ते १९ मे २०१४ या चार महिन्यांच्या कालावधीत तब्बल ६५ लाचखोर अधिकारी-कर्मचारी यांच्यावर
अहमदनगर: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक विभागाने १ जानेवारी ते १९ मे २०१४ या चार महिन्यांच्या कालावधीत तब्बल ६५ लाचखोर अधिकारी-कर्मचारी यांच्यावर सापळे लावून त्यांना अटक केली आहे. नाशिक विभागाची ही कामगिरी राज्यात अव्वल ठरली आहे. नाशिक विभागांतर्गत येत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात चार महिन्यांमध्ये १७ अधिकारी-कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ््यात अडकले आहेत. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेच ही आकडेवाडी संकेतस्थळावर जाहीर केली आहे. नाशिक विभागामध्ये नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, जळगाव आणि धुळे हे पाच जिल्हे येतात.१ जानेवारी ते १९ मे या काळात लाच घेणार्या अधिकार्यांविरुद्ध तक्रारींचा ओघ वाढला आहे. जशा तक्रारी आल्या तसेच सापळे रचले आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यात १६, अहमदनगर जिल्ह्यात १७, नंदुरबार जिल्ह्यात ६, जळगाव जिल्ह्यात १५, धुळे जिल्ह्यात ११ सापळे लावण्यात आले होते. या सापळ््यामध्ये ६५ अधिकारी-कर्मचारी अटक करण्यात आले होते. नाशिक विभागात लाच घेणार्या अधिकार्यांमध्ये अहमदनगर जिल्ह्याचा वरचा क्रमांक आहे. राज्यात नाशिक विभाग लाच घेण्यात अव्वल ठरला आहे. यामध्ये मुंबई विभागात ३३, ठाणे विभागात ४८, पुणे विभागात ५८, नाशिक विभागात ६५, नागपूर विभागात ४६, अमरावती विभागात ३९,औरंगाबाद विभागात ६०, नांदेड विभागात ५१ अधिकारी-कर्मचारी लाचेच्या जाळ््यात अडकले आहेत. लाच घेण्याच्या तक्रारी येण्यामध्ये राज्यभरात ७८ टक्के वाढ झाली आहे. नाशिक विभागात लाचखोर अधिकार्यांवर रचलेल्या सापळ््यांचे प्रमाण ११० टक्के इतके झाले आहे. सापळा रचल्यानंतर लाचखोर अधिकार्यांच्या तपासाचे प्रमाण मात्र नगण्य आहे. चार महिन्यांमध्ये ६५ पैकी दोनच प्रकरणांचा आतापर्यंत तपास पूर्ण झाला आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी सांगितले की लाचलुचपत प्रतिबंधक विभाग स्वत:हून सापळा रचू शकत नाही. तक्रार आली की सापळा लावला जातो. राज्यभरात लाचखोर अधिकार्यांची संपत्ती बाहेर काढल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाबाबत सामान्य लोकांमध्ये विश्वास वाढला. त्यामुळेच लाचखोर अधिकारी, कर्मचारी यांच्याबाबत तक्रारी देण्याचा ओघ वाढला आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये तक्रारींच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक दिवसांपासून लोकांना तक्रारी करायच्या होत्या. मात्र राज्यभरात होत असलेल्या कारवायांमुळे लोकांमध्ये तक्रार करण्याचे धैर्य वाढले आहे. (प्रतिनिधी) गतवर्षीच्या पहिल्या चार महिन्यांमध्ये लावलेल्या सापळ््यांमध्ये २२५ अधिकारी-कर्मचारी अडकले होते. तीच संख्या यंदा दुपटीने वाढली आहे. यंदा पहिल्या चार महिन्यांमध्येच सापळा लावलेल्या लाचखोर अधिकार्यांची संख्या ४०० पर्यंत गेली आहे. म्हणजे गतवर्षीपेक्षा लाचखोरांवर सापळा लावलेल्या कारवायांची संख्या दुपटीने वाढली आहे.