कुकाणा-वरखेड रस्त्यावरील पूल उखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 12:29 PM2020-09-26T12:29:31+5:302020-09-26T12:30:34+5:30
नेवासा तालुक्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने कुकाणा-वरखेड रोडवरील मळीचा ओढ्यावरील पर्यायी पूल वाहून गेला आहे. यामुळे या रस्त्यावरील जड वाहतूक सहा तासापासून ठप्प झाली आहे.
तरवडी : नेवासा तालुक्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने कुकाणा-वरखेड रोडवरील मळीचा ओढ्यावरील पर्यायी पूल वाहून गेला आहे. यामुळे या रस्त्यावरील जड वाहतूक सहा तासापासून ठप्प झाली आहे.
या रोड वरील पुलाचे काम चालू आहे. पुलाचे काम चालू असल्याने रहदरीसाठी पर्यायी रस्ता काढून दिलेला होता. परंतु तो ही सोमवारी झालेल्या पावसामुळे रस्ता वाहून गेला.
वास्तविक पाहता संबंधित पुलाचे काम अगोदर होणे गरजेचे होते परंतु तसे झालेले नाही. यामुळे गेवराई, वाकडी, सुल्तानपूर, शिरजगाव, वरखेड गावाकडे जाणारा मार्ग तब्बल ६ तास बंद होता. आजही पुलाचे काम सुरू न झाल्याने इतर गावांशी संपर्क तुटतो की काय? अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.