साई इंटरनॅशनल मॅरेथॉनच्या प्रचारासाठी मुंबईहून निघालेले ब्रिज शर्मा शिर्डीत दाखल, 250 किमी अंतर 43 तासात केलं पार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 12:32 PM2017-12-25T12:32:19+5:302017-12-25T12:52:04+5:30
शिर्डीत येत्या 11 फेब्रवारी रोजी होणाऱ्या साई इंटरनॅशनल मॅरेथॉनच्या प्रचारासाठी 23 डिसेंबरला सिध्दीविनायक मंदिरापासून शिर्डी साईबाबा मंदीरा पर्यंत धावण्यास सुरुवात केलेले ब्रिज शर्मा 250 किमी अंतर 43 तासात पार करत आज सकाळी शिर्डीत पोहचले.
शिर्डी- शिर्डीत येत्या 11 फेब्रवारी रोजी होणाऱ्या साई इंटरनॅशनल मॅरेथॉनच्या प्रचारासाठी 23 डिसेंबरला सिध्दीविनायक मंदिरापासून शिर्डी साईबाबा मंदीरापर्यंत धावण्यास सुरुवात केलेले ब्रिज शर्मा 250 किमी अंतर 43 तासात पार करत आज सकाळी शिर्डीत पोहचले.
शिर्डीत साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी शर्मा यांच स्वागत केले. शर्मा यांनी साईंच्या मंदिरात जाऊन साई समाधीच दर्शन घेत रन फॉर साई हा संदेश दिला.
साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षाच्या निम्मिताने प्रसिध्द मॅराथॉन आर्गनायझर चॅम्प एनड्युरन्स ही संस्था येत्या 11 फेब्रुवारी रोजी शिर्डीत साई इंटरनॅशनल मॅराथॉन आयोजीत करत असुन रन फाँर साई हा संदेश दिला जाणार आहे. या मँराथाँनच प्रमोशन करण्यासाठी प्रसिध्द धावपट्टु ब्रिज मोहन शर्मा यांनी मुबईतील सिध्दी विनायक मंदीरा पासुन शिर्डी साठी धावण्यास सुरवात केली होती. शर्मा हे 43 तासा अखंड धावत आज सकाळी शिर्डीत पोहचले शिर्डीत त्यांच मोठया उत्साहात स्वागत करण्यात आलं.
ब्रिज शर्मा नौदलात असून त्यांनी एव्हरेस्ट वर यशस्वी चढाई केली आहे. याशिवाय कॅलिफोर्नियातील बॅड वॉटरस्पर्धेत यश मिळवले आहे. शिर्डी इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धेत 3,5.10.21 42 कीमी अशी असणार आहे.