अहमदनगर एमआयडीसीमधील कारखान्यांवर मालमत्ताकराच्या थकबाकी वसुलीसाठी कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:45 PM2020-03-17T12:45:19+5:302020-03-17T12:47:31+5:30

मालमत्ताकराच्या थकबाकीवसुलीसाठी नवनागापूर येथील ग्रामपंचायतीने मालमत्ता जप्त करण्याची धडक कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी सकाळी ही कारवाई सुरू झाली. नवनागापूर ग्रामपंचायती अंतर्गत ३६ कारखान्यांनी ग्रामपंचायतीची १ कोटी ९८ लाख २७ हजार ६८२ रुपयांचा मालमत्ताकर थकवला आहे. त्यामुळे थेट कारखाने सील केले जात आहेत.

Budget of action for arrears of property levy on factories in Ahmednagar MIDC | अहमदनगर एमआयडीसीमधील कारखान्यांवर मालमत्ताकराच्या थकबाकी वसुलीसाठी कारवाईचा बडगा

अहमदनगर एमआयडीसीमधील कारखान्यांवर मालमत्ताकराच्या थकबाकी वसुलीसाठी कारवाईचा बडगा

नागेश सोनवणे/
निंबळक : मालमत्ताकराच्या थकबाकीवसुलीसाठी नवनागापूर येथील ग्रामपंचायतीने मालमत्ता जप्त करण्याची धडक कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी सकाळी ही कारवाई सुरू झाली. नवनागापूर ग्रामपंचायती अंतर्गत ३६ कारखान्यांनी ग्रामपंचायतीची १ कोटी ९८ लाख २७ हजार ६८२ रुपयांचा मालमत्ताकर थकवला आहे. त्यामुळे थेट कारखाने सील केले जात आहेत. गटविकास अधिकारी संजय केदारे, चंद्रकांत खाडे, टी. एन. तुपे, सरपंच सुशीला जगताप बबनराव डोंगरे, आप्पासाहेब सप्रे, संजय भोर, ग्रामविकास अधिकारी संजय मिसाळ सह पोलीस बंदोबस्त ही कारवाई सुरू आहे.
हे आहेत थकबाकीदार- वीर अलाईज अ‍ॅण्ड स्टील के. प्रा.लि ( १०७३५७७ ), नव महाराष्ट्र फ्लोअर मिल ( १०९७४५८ ), बोथरा अ‍ॅग्रो इक्युप मेटस प्रा.लि (४२२८२३ ), अपेक्स एन कॉन प्रा.लि. (३९६४८९), सरस्वती दाल अ‍ॅण्ड बेसन (४१९५७६), रूषा इंजि प्रा.लि. (६००३६५ ), अहमदनगर अलाईज प्रा.लि ( ७८२१४९ ), शासकीय दूध योजना (२४ ३१०८६), विश्व इलेक्ट्रॉनिक्स (१३३९८०४), बिकसन इंजिनिअरिंग वर्क्स (2८८७१९ ), पायोनियर वर्ल्ड ( २८९०६३ ), सलू जा सोप्स इंडस्ट्रीज (२६२२८१), डोम बेल इलेक्ट्रॉनिक्स (१४९३७११), व्हलक्न इंजि. ( १११४७५३) , चव्हाण अ‍ॅण्ड सन्स संजय टाईल्स (९६४९१), काऊन कोटिंग अ‍ॅण्ड इंजी (३०१४२५), ओंकार फौंड्री अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग (४२०८७६ ), सम्राट इंडस्ट्रीज (५५७८७६), सिध्दी प्रिसिजन कांम्पोनंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्सेसरीज (६०८८८९ ), सिद्धी आॅटो मोटर्स प्रा.लि, ( ७५७३८७), क्लासिक व्हील प्राय.लि (२६०४३१६), गरवारे मरीन इंडस्ट्रीज (७६४७०४ ). क्लासिक व्हील प्रायव्हेज लि. (६९४६१०), जेमिनी सेल्स कॉपौरेशन (२९३०६ ), इकोनॉमिक्स ट्रान्सपोर्ट आॅरगनायजेस (१०९१२५), एस.एम.आॅटोमोबाईल्स (११०९४२), सुप्रिम रोडवेज ( १८९७२३ ),  राजू कम्युनिकेशन (७०६७१ ), एम.पी.वेअर हाऊस (३८५६५), ठिपसे अ‍ॅण्ड सन्स (५२३०२ ), आर.आर.फास्ट नर्स (७२५४१ ), बी.जी.डोंगरे कन्स्ट्रक्शन (३२७२४), कांचन इंडस्ट्रीज (६८०५४), वर्षा इंडस्ट्रीज (९३२७०), भारत इलेक्ट्रो प्रॉडक्ट (६६६६२ ), ए.एम., इलेक्ट्रॉनिक्स (७५३६९ ).

Web Title: Budget of action for arrears of property levy on factories in Ahmednagar MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.