नगरमधील सराफा बाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:26 AM2021-08-24T04:26:13+5:302021-08-24T04:26:13+5:30
अहमदनगर : येथील नगर सराफ सुवर्णकार संघटनेने शासनाच्या हॉलमार्क प्रणालीला विरोध करीत सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला. यामुळे ...
अहमदनगर : येथील नगर सराफ सुवर्णकार संघटनेने शासनाच्या हॉलमार्क प्रणालीला विरोध करीत सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला. यामुळे सोमवारी दिवसभर नगर शहरातील सराफ बाजार बंद होता. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली.
सराफ सुवर्णकार संघटनेच्या वतीने सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुभाष मुथा, सुभाष कायगावकर, प्रकाश लोळगे, प्रमोद बुऱ्हाडे, अमित पोखरणा, अमित कोठारी, संतोष देडगावकर, ईश्वर बोरा, नितीन शिंगवी, अमोल देडगावकर, संजय शिंगवी, सुनील डवळे, प्रकाश हिंगणगावकर, शुभम मिरांडे, मयूर कुलथे, अतुल बोरा, मुकुंद रत्नापूरकर, दिनेश देशमुख, राहुल देडगावकर, महेश देशमुख, बंटी देवळालीकर, रसिक कटारिया, सुरेश मुथ्था, दिलीप मुथ्था, विनीत मुथ्था, सहदेव महेंद्र , सोमनाथ मैड, शाम मुंडलिक, संतोष मुथ्था, विशाल वालकर, प्रकाश देवळालीकर, गोपाल वर्मा, गणेश मुंडलिक, जगदीश ज्वेलर्स, एस बुऱ्हाडे सराफ, एस. आर. देशमुख, अजय ज्वेलर्स, के.आर. आदीच्या सह्या आहेत.
या निवेदनात म्हटले आहे की, हॉलमार्किंग संबंधित धोरणावर सराफांचा बिनशर्त पाठिंबा आहे. मात्र, या कायद्यात संदिग्धता आणि स्पष्टतेचा अभाव आहे. १६ जूनपासून रत्न आणि दागिने उद्योगावर अनिवार्य हॉलमार्किंग लागू करण्यात आले आहे. मात्र, व्यावसायिकांना येणाऱ्या समस्या अद्याप सोडवल्या गेल्या नाहीत. परिणामी, संपूर्ण मूल्य साखळी थांबली असून उद्योग कोसळण्याच्या मार्गावर आहे.
या आहेत मागण्या
हॉलमार्किंग विक्रीच्या ठिकाणी लागू असावे. व्यवसाय करणे सुलभ करण्यासाठी आणि ज्वेलर्सना अनावश्यक त्रास कमी करावा. मार्किंग प्रक्रियेच्या जुन्या पद्धतीला त्वरित प्रभावाने परवानगी द्यावी. सोन्याच्या शुद्धतेची जबाबदारी हॉलमार्किंग केंद्रांवर टाकली पाहिजे. ग्राहकांच्या हितासाठी दर्जेदार उत्पादने विकण्याची परवानगी दिली पाहिजे. हॉलमार्किंग केंद्रे उभारणे खाजगी उद्योजकांच्या हातात आहे. पुढे किती वेगाने आणि कुठे केंद्रे उभारली जातील, हे आम्हाला माहीत नाही. यामुळे व्यापारात पूर्ण अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सरकारने जुना उद्योग वाचविण्याची गरज आहे.
--
फोटो-२३ सराफा संघटना
सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंगबाबतच्या कायद्यातील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी सराफा व्यावसायिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.