श्रीरामपुरात जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा, पाइपलाइनला गळती, ग्रामपंचायतीचा योजना स्वीकारण्यास नकार
By शिवाजी पवार | Published: July 27, 2023 02:59 PM2023-07-27T14:59:40+5:302023-07-27T15:00:50+5:30
Ahmednagar: जलजीवन मिशन योजनेत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित झालेली पहिलीच योजना वादात सापडली आहे. योजना हस्तांतरित होण्यापूर्वीच पाइपलाइनला गळती लागल्याने दीड कोटी रुपये खर्च पाण्यात जाण्याची भीती आहे.
- शिवाजी पवार
अहमदनगर - जलजीवन मिशन योजनेत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित झालेली पहिलीच योजना वादात सापडली आहे. योजना हस्तांतरित होण्यापूर्वीच पाइपलाइनला गळती लागल्याने दीड कोटी रुपये खर्च पाण्यात जाण्याची भीती आहे. त्यामुळे संतापलेल्या सरपंच व सदस्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
तालुक्यातील कारेगावचे सरपंच आनंद वाघ, सदस्य सुनील पटारे यांच्यासह नऊ सदस्यांनी शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर उपोषण सुरू केले आहे. त्यांनी योजनेचा ताबा घेण्यास नकार दिला आहे. ही योजना सुरू होण्यापूर्वीच दुरुस्तीला आल्याने ती ताब्यात घेता येणार नाही. दुरुस्तीवर हजारो रुपये खर्च ग्रामपंचायत करू शकत नाही, असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.