कान्हूरपठार येथे घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:18 AM2021-01-21T04:18:59+5:302021-01-21T04:18:59+5:30

रविवारी मध्यरात्री तुषार ठुबे, त्यांची आई ,मुलगी व बहीण हॉलमध्ये झोपले होते. पत्नी मामे भावाचे लग्न असल्याने राहुरी येथे ...

Burglary at Kanhur Plateau | कान्हूरपठार येथे घरफोडी

कान्हूरपठार येथे घरफोडी

रविवारी मध्यरात्री तुषार ठुबे, त्यांची आई ,मुलगी व बहीण हॉलमध्ये झोपले होते. पत्नी मामे भावाचे लग्न असल्याने राहुरी येथे गेली होती. मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या आईला पाण्याचा ग्लास पडण्याचा आवाज आल्याने त्यांंना जाग आली. जिन्यातील दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वरती जाऊन पाहिले असता बेडरूमचा ही दरवाजा उघडा दिसला. त्यामधील लाकडी कपाटातील समान अत्यवस्थ पडलेले पाहून घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांने आपला मुलगा तुषार यास झोपेतून उठवून त्यांची कल्पना दिली. तुषारने शेजारी राहणाऱ्या विक्रांंत ठुबे यास फोन करून घरी चोरी झाल्याची माहिती दिली. मध्यरात्री विक्रांंत त्यांच्या घराबाहेर आल्यावर तुषारने हॉलचा दरवाजा उघडला. बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता लाकडी कपाटातील सोन्याचा दागिने असलेला बॉक्स व रोक्कड चोरीला गेल्याचे त्यास समजले. या घटनेची माहिती सकाळी पारनेर पोलीस स्टेशनला कळल्यावर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरी गेलेल्या मुद्देमालामध्ये सहा तोळ्यांचे मंगळसूत्र, चार तोळ्यांचा राणीहार, पाच तोळ्यांचा नेकलेस, एक तोळ्यांचे कर्णफुले, अंगठी, लहान मुलीची साखळी व रोख रोक्कड पन्नास हजार रुपये इ.चा समावेश आहे. या घटनेचा तपास पारनेर पोलीस ठाणाचे एपीआय राजेश गवळी व बालाजी पदमने करत आहेत.

Web Title: Burglary at Kanhur Plateau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.