येळपणेच्या खंडेश्वर महाराज मंदिरात चोरी; चांदीचा मुखवटा व दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 09:28 IST2020-06-14T09:28:15+5:302020-06-14T09:28:28+5:30
श्रीगोंदा : येळपणे गावचे जागृत ग्रामदैवत खंडेश्वर महाराज मंदिरातील सुमारे दोन लाख किमंतीचा चांदीचा मुखवटा व सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे.

येळपणेच्या खंडेश्वर महाराज मंदिरात चोरी; चांदीचा मुखवटा व दागिने लंपास
श्रीगोंदा : येळपणे गावचे जागृत ग्रामदैवत खंडेश्वर महाराज मंदिरातील सुमारे दोन लाख किमंतीचा चांदीचा मुखवटा व सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे.
घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलिस निरीक्षक अरविंद माने हे रविवारी सकाळी सात वाजता घटनास्थळी दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात श्वान पथक दाखल होत आहे.
खंडेश्वर महाराजांसाठी पाच किलो वजनाचा चांदीचा मुखवटा व दोन तोळे सोन्याचे दागिने केले होते. मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम गेल्या काही महिन्यांपासून चालू आहे. खंडेश्वर महाराजांचा चांदीचा मुखवटा चोरीस गेला, ही बातमी रविवारी सकाळी वाऱ्यासारखी गावात परसली आणि भाविकांनी मंदीर परिसरात एकच गर्दी केली.
पोलिस उपाधीक्षक संजय सातव हे घटनास्थळी थोड्याच वेळात दाखल होत आहेत.
या चोरीचा तपास पोलिसांनी लावावा, अशी मागणी येळपणे पिसोरे ग्रामस्थांनी केली आहे.
Att