तांगडी गावात घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 11:36 AM2020-06-19T11:36:02+5:302020-06-19T11:36:12+5:30

संगमनेर तालुक्यातील आंबी खालसाजवळील तांगडी येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातून १ लाख ५२ हजार रूपयांचा ऐवज रोख रक्कमेसह लांबविल्याची घटना घडली. याबाबत घारगाव पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Burglary in Tangdi village; Looted Rs 1.5 lakh | तांगडी गावात घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लांबविला

तांगडी गावात घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लांबविला

घारगाव : संगमनेर तालुक्यातील आंबी खालसाजवळील तांगडी येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातून १ लाख ५२ हजार रूपयांचा ऐवज रोख रक्कमेसह लांबविल्याची घटना घडली. याबाबत घारगाव पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

    तांगडी येथे पूजा प्रवीण तांगडकर यांच्या घरी (दि.३ जून) सायंकाळी पाच ते मंगळवारी (दि. १६ जून) रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. कपाटातील एक ते दीड तोळे सोन्याचे नेकलेस, एक तोळे सोन्याची पोत, दीड तोळे सोन्याची दोन पदरी पोत असे एकूण चार तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम ५५ हजार रुपये चोरून नेले. 

    यावेळी चोरट्यांनी घरातील बत्तीस इंची एलईडी टिव्ही, १८ इंची एल.सी.डी टिव्ही व जुन्या साड्या असा एकूण एक लाख ५२ हजार पाचशे रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. घरात चोरी झाल्याचे पूजा तांगडकर यांच्या उशिरा लक्षात आले. 

     पूजा तांगडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे हे करीत आहेत.
 

Web Title: Burglary in Tangdi village; Looted Rs 1.5 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.