संगमनेरात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
By शेखर पानसरे | Published: November 7, 2022 06:18 PM2022-11-07T18:18:11+5:302022-11-07T18:19:36+5:30
नाशिक-पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा येथील टोलनाका परिसरात कृषीमंत्री सत्तार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे संगमनेर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झालेले पहायला मिळाले. सोमवारी (दि. ७) नाशिक-पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा येथील टोलनाका परिसरात कृषीमंत्री सत्तार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपील पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय भालेराव, शहराध्यक्ष राहुल वर्पे, किरण घोटेकर, मनीष माळवे, अमोल राऊत, नितीन आहेर, गजानन भोसले, प्रसाद काळे, अशोक काळे, तुषार वाळे, विकी पवार, शशिकांत पवार, गणेश गुंजाळ आदी यावेळी उपस्थित होते.
‘लोकमत’शी बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवार म्हणाले, अब्दुल सत्तार यांनी कृषीमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी महिलांचा अपमान करणे ही बाब अतिशय गंभीर आहे. सत्तार यांनी माफी मागितली असली तरीही त्यांचा राजीनामा झाला पाहिजे. जोपर्यंत ते राजीनामा देत नाहीत तोपर्यंत त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आमच्या अहमदनगर जिल्ह्यात फिरू देणार नाहीत. आज त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. उद्या यापेक्षाही तीव्र आंदोलन करू. खासदार सुप्रिया सुळे आमच्या नेत्या आहेत. त्यांच्याबद्दल एकही अपशब्द आम्ही ऐकून घेणार नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"