जयाजी सुर्यवंशी यांच्या पुतळ्याचे दहन

By Admin | Published: June 4, 2017 04:11 PM2017-06-04T16:11:30+5:302017-06-04T17:21:22+5:30

सुर्यवंशी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे जवळे (ता़ पारनेर) येथे दहन करुन जोडे मारो आंदोलन करण्यात आले़

The burning of the statue of Jayaji Suryavanshi | जयाजी सुर्यवंशी यांच्या पुतळ्याचे दहन

जयाजी सुर्यवंशी यांच्या पुतळ्याचे दहन

आॅनलाईन लोकमत
जवळे, दि़ ४ - शेतकऱ्यांच्या संपात फुट पाडण्यास जबाबदार असलेल्या जयाजीराव सुर्यवंशी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे जवळे (ता़ पारनेर) येथे दहन करुन जोडे मारो आंदोलन करण्यात आले़ यावेळी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
राज्यातील शेतकरी कर्जमाफीसाठी संपावर गेले़ मात्र, जयाजी सर्यवंशी यांनी शेतकऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन संप मागे घेतल्याचे शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केले़ त्यामुळे संपकरी शेतकरी सुर्यवंशी यांच्याविरोधात प्रचंड संतापले आहेत़ ठिकठिकाणी सुर्यवंशी यांच्या पुतळ्याचे दहन केले जात असताना रविवारी सकाळी जवळे येथेही सुर्यवंशी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले़ यावेळी सुर्यवंशी व भाजप सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़

Web Title: The burning of the statue of Jayaji Suryavanshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.