बस चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले ४५ प्रवाशाचे प्राण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 01:28 PM2020-01-11T13:28:46+5:302020-01-11T13:29:28+5:30

एस.टी.बसचा स्टेअरिंग रॉड अचानक तुटला. परंतु बस पुलावरून उलटण्याच्या अगोदर चालक विजय कारखिले प्रसंगावधान दाखवून हॅण्ड ब्रेक लावले. त्यामुळे सुमारे ४५ शाळकरी मुलांचे व प्रवाशांचे प्राण वाचले.

The bus driver's condition was read out to the passenger | बस चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले ४५ प्रवाशाचे प्राण 

बस चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले ४५ प्रवाशाचे प्राण 

श्रीगोंदा : एस.टी.बसचा स्टेअरिंग रॉड अचानक तुटला. परंतु बस पुलावरून उलटण्याच्या अगोदर चालक विजय कारखिले प्रसंगावधान दाखवून हॅण्ड ब्रेक लावले. त्यामुळे सुमारे ४५ शाळकरी मुलांचे व प्रवाशांचे प्राण वाचले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बेलवंडीनजीक शिंदेवाडीनजीक घडली. 
 श्रीगोंदा-शिरुर ही श्रीगोंदा आगाराची बस (बस क्रमांक एम.एच-४०,एन-८७४५) बेलवंडी, उक्कडगाव, चोभेवस्ती, पिंपरी चौफुलाकडे जाणारी शाळकरी मुले घेऊन शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास  चालली होती. यावेळी बस बेलवंडीजवळील शिंदेवाडी येथील एका पुलाजवळ आली असता बसचे स्टेअरिंग नादुरुस्त झाले. परंतु मोठा अपघात होण्याच्या अगोदर काही क्षण चालक विजय कारखिले यांनी हॅण्ड ब्रेक लावून बस थांबविली आणि प्रवाशांचा जीव वाचविला. 
श्रीगोंदा बसचे आगार व्यवस्थापक प्रवीण शिंदे यांनी तातडीने घटनास्थळास भेट दिली. ही बस तपासणीसाठी नगर येथील वर्कशॉपमध्ये पाठविली आहे. स्टेअरिंग रॉड का? तुटला याची तपासणी होणार आहे? यानंतरच ही बस पुन्हा रस्यावर येणार आहे, असे प्रवीण शिंदे यांनी सांगितले. 
बसचा अपघात होण्यापूर्वीच हॅण्ड ब्रेक लावले. यामुळे सुमारे ६५ प्रवाशांचा जीव वाचविला. त्याबद्दल बसचालक विजय कारखिले यांचा श्रीगोंदा आगाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. कारखिले यांनी बसचालक म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली याबद्दल त्यांचे प्रवाशांनीही कौतुक केले. 

Web Title: The bus driver's condition was read out to the passenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.