भंडारदरा परिसरातील टेंटधारकांचा व्यवसाय थंडावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:27 AM2021-02-27T04:27:25+5:302021-02-27T04:27:25+5:30

भंडारदरा : भंडारदरा हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. या पर्यटनस्थळाकडे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. परंतु, यावर्षी कोरोना ...

The business of tent holders in Bhandardara area cooled down | भंडारदरा परिसरातील टेंटधारकांचा व्यवसाय थंडावला

भंडारदरा परिसरातील टेंटधारकांचा व्यवसाय थंडावला

भंडारदरा : भंडारदरा हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. या पर्यटनस्थळाकडे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. परंतु, यावर्षी कोरोना महामारीमुळे पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक तरुणांचा रोजगार बंद झाला होता. परंतु, नाताळ व नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच पर्यटकांची हळूहळू गर्दी वाढत असतानाच कोरोनाची दुसरी लाट राज्यात आल्याने त्याचा परिणाम भंडारदरा परिसरातील टेंट (तंबू) धारकांच्या व्यवसायावर पडला आहे.

भंडारदरा हे पर्यटनस्थळ नेहमीच पर्यटकांनी गजबजलेले असते. या परिसरातील आदिवासी तरुण पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या परिवाराची उपजीविका करतात. परंतु, मागील वर्षी कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय पूर्णपणे कोलमडला होता. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून पर्यटकांची गर्दी वाढत चालली होती. यामुळे या परिसरातील तरुणांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला होता. परंतु, आता पुन्हा राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली, तर या परिसरातील आदिवासी तरुणांवर पुन्हा एकदा उपासमारीची वेळ येईल. या परिसरातील रिंगरोडवर शेंडी, भंडारदरा, मुरशेत, पांजरे, उडदावणे, घाटघर, साम्रद, रतनवाडी, मुतखेल या गावांतील अनेक तरुणांचे संसार या व्यवसायावर अवलंबून आहेत. तसेच या परिसरातील शेतकरी आपल्या शेतात पिकवलेले भात, नाचणी व इतर धान्य योग्य दरात पर्यटनाच्या माध्यमातून विकत असल्याने शेतकऱ्यांनादेखील एकप्रकारे आर्थिक मदत होत असते.

..........

मागील आठवड्यापासून गर्दी कमी

मागील एकदोन आठवड्यांपासून पर्यटकांची गर्दी कमी झाली आहे. जर अशीच संख्या कमी होत राहिल्यास आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागेल. त्यामुळे येथील व्यावसायिक तरुणाई चिंतेत सापडली आहे.

......................

पर्यटकांची संख्या कमी झाली असल्याने पुन्हा आर्थिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी काय कामधंदा करावा, ते सुचेना.

- बुवाजी गांगड, स्थानिक व्यावसायिक

२६भंडारदारा

Web Title: The business of tent holders in Bhandardara area cooled down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.