भिंगार शहरात केबल वॉर भडकले

By Admin | Published: March 16, 2016 11:48 PM2016-03-16T23:48:23+5:302016-03-16T23:57:23+5:30

अहमदनगर : भिंगार शहरातील केबल व्यावसायिकांच्या दोन गटात मंगळवारी सायंकाळी चांगलीच हाणामारी झाली. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत.

The cable war broke out in the city of Bhingar | भिंगार शहरात केबल वॉर भडकले

भिंगार शहरात केबल वॉर भडकले

अहमदनगर : भिंगार शहरातील केबल व्यावसायिकांच्या दोन गटात मंगळवारी सायंकाळी चांगलीच हाणामारी झाली. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत. सहा जणांविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिंगार शहरात मंगळवारी सायंकाळी भिंगार आणि आलमगीर येथील दोन गटात तुफान हाणामारी झाली. या प्रकरणी रात्री परस्परविरोधात फिर्यादी दाखल केल्या. त्यावरून कॅम्प पोलिसांनी दोन्ही गटाच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शेख शाकीर अब्दुल गणी (रा. आलमगीर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सूरज भोयर, संजय छजलानी (रा. भिंगार) यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
मंगळवारी साडेचार वाजता भिंगार येथील पंचशीलनगरमध्ये शेख गणी यांच्या घराशेजारी राहणारे इम्रान शेख सलीम याचे सूरज भोयर उर्फ सन्नी याचेसोबत वाद झाले होते. यावेळी शेख गणी यांनी मध्यस्थी केली असता आरोपींनी डोक्यात लाकडी दांडके घालून जखमी केले. तसेच संजय छजलानी याने इम्रान शेख याचे हातावर दांडक्याने मारले. तसेच इतर चार इसमांनी मारहाण केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी फिर्याद शकुंतला बाबुलाल छजलानी (वय ६५, रा. आंबेडकर कॉलनी, भिंगार) यांनी केली आहे. यात म्हटले आहे की, इम्रान शेख, शेख शाकीर गणी, निस्सार, कोकणे (पूर्ण नाव नाही) व इतर दोन अशा सहा जणांनी जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी केली. छजलानी यांच्या घरासमोर सहा जण आले आणि त्यांनी गेटला लाथा मारल्या. फिर्यादिच्या चुलत सून तसेच नातू आकाश याला मारहाण, जातीवाचक शिवीगाळ केली. सदरची मारहाण ही केबल व्यावसायिकांच्या दोन गटामध्ये असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एम.डी. अहिरे तपास करीत आहेत.
(प्रतिनिधी)

Web Title: The cable war broke out in the city of Bhingar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.