शासकीय आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 10:47 AM2020-02-06T10:47:51+5:302020-02-06T10:49:24+5:30
शासकीय आदिवासी वसतीगृहातील सुमारे २५० मुलांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.
संगमनेर : घुलेवाडी येथील शासकीय आदिवासी वसतीगृहातील मुलांनी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन मध्यरात्री झालेल्या बैठकीत मागे घेण्यात आले.
नाशिक येथील आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त गिरीश सरोदे यांनी बुधवारी ( ५ फेब्रुवारी) रात्री मुलांची बैठक घेतली. यावेळी संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार, अधिकाऱ्यांची चौकशी करणार या मागण्या मान्य झाल्यानंतर मुलांनी सकाळी पोह्याचा नाश्ता घेऊन आंदोलन मागे घेतले. गेले तीन दिवस हे आंदोलन सुरू होते.
गेल्या अनेक दिवसापासून निकृष्ठ अन्न मिळत आहे. तरीही जेवणाचा ठेका घेतलेल्या ठेकेदारावर कारवाई होत नाही. यामुळे संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील शासकीय आदिवासी वसतीगृहातील सुमारे २५० मुलांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.