छावणी परिषद भिंगारमध्ये करणार जीवनावश्यक वस्तुंची आॅनलाईन विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 12:23 PM2020-04-16T12:23:46+5:302020-04-16T12:25:36+5:30
भिंगार : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी छावणी परिषदने आॅनलाईन किराणा, भाजीपाला विक्री आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी छावणी परिषदेने संकेतस्थळावर विक्रेत्यांची यादीच प्रसिद्ध केली आहे.
अनिकेत यादव

छावणी परिषद हद्दीतील सर्व नागरिकांना सोशल मीडिया मार्फत कळविण्यात आले आहे. कोरोना विषाणूपासून रक्षण करण्यासाठी छावणी परिषदने औषध, दुकान, किराणा मालाचे दुकान, व भाजी विक्रेत्यांची यादी केली आहे. छावणी परिषदने वेबसाईट वर ही यादी प्रसिध्द केलेली आहे. सदर यादीत दुकानदारांचे मोबाईल क्रमांकही देण्यात आले आहेत. यादीमधील मोबाईलवर फोन करुन आपण औषधे,किराणामाल व भाजीपाला घरपोहच मागवू शकता. नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम पाळून प्रशासनांस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
----------------------
छावणी परिषद अधिकाºयांनी व कर्मचºयांनी सर्व भिंगार मधील व्हॉट्सअप ग्रुप वर सोशल मीडिया मार्फत नागरिकांना आवाहन केले आहे. घराबाहेर न पडता जीवनावश्यक वस्तू मोबाईलद्वारे घरपोच मागू शकता. त्यामुळे आपण कोरोनाला हरवू शकतो. योग्य त्या दरामध्ये या वस्तू मिळतील. भिंगारचे नागरिक कोरोनाला नक्कीच हरवतील असा विश्वास आहे.
-विद्याधर पवार, छावणी परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी