अभियानात राबले हात अन् श्रीगोंदा शहर झाले चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:21 AM2020-12-31T04:21:12+5:302020-12-31T04:21:12+5:30
श्रीगोंदा : नगरपालिकेने राबविलेल्या माझी वसुंधरा अभियानात शहरातील विविध भागाची स्वच्छता करून वृक्षारोपण करण्यात आले. त्यामुळे श्रीगोंदा शहराचा प्रमुख ...
श्रीगोंदा : नगरपालिकेने राबविलेल्या माझी वसुंधरा अभियानात शहरातील विविध भागाची स्वच्छता करून वृक्षारोपण करण्यात आले. त्यामुळे श्रीगोंदा शहराचा प्रमुख परिसर चकाचक झाला आहे. यासाठी शहरातील हजारो हात राबले.
७ डिसेंबरपासून संत शेख महंमद महाराज मंदिर परिसरात या अभियानास सुरवात करण्यात आली. सिद्धार्थनगर, पंचायत समिती, तहसील कार्यालय, ग्रामीण रूग्णालय, सिद्धेश्वर मंदिर घाट, पोलीस ठाणे, बगाडे काॅर्नर, बसस्थानक परिसराची स्वच्छता करण्यात आली. ईदगाह मैदान, खंडोबा मंदिर, परिसर स्वच्छ केला. स्मिता हराळ, प्रियंका शिंदे यांनी खंडोबा मंदिरासमोर ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’, अशा स्लोगनची रांगोळी काढली. शहरातून रॅली काढली आणि या अभियानाची सांगता करण्यात आली.
या अभियानात नगराध्यक्षा शुभांगी पोटे, उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे, मुख्याधिकारी मंगेश देवरे, सीमा गोरे, शहाजी खेतमाळीस, सतीश मखरे, संग्राम घोडके, ज्योती खेडकर, प्रशांत गोरे, संतोष खेतमाळीस, दत्ताजी जगताप, संतोष क्षीरसागर आदींनी सहभाग घेतला.
दक्ष फाउंडेशन, मेडिकल असोसिएशन, महाराजा जिवाजीराव शिंदे, छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे एनसीसीचे जवान, त्रिदल अकॅडमी आदींनी सहभाग नोंदविला.
----
नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांची स्वच्छतादूताची भूमिका
स्वच्छता अभियानात राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी इतर ठिकाणी फोटो सेशनसाठी झाडू हातात घेऊन देखावा करतात. येथे मात्र नगराध्यक्षा शुभांगी पोटे, मुख्यायाधिकारी मंगेश देवरे व काही नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी यांनी अभियानात घाम गाळला आणि स्वच्छतादूत म्हणून भूमिका पार पाडली. पदाधिकारी, अधिकारी यांनीच थेट सहभाग घेतल्याने इतरही सहभागी झाले.
फोटो : ३० श्रीगोेंदा १
श्रीगोंदा येथील स्वच्छता अभियानात सहभागी झालेले पदाधिकारी, अधिकारी, कर्मचार व इतर.